Kantara esakal
मनोरंजन

Kantara: कसा तयार झाला कांतारा? रिषभनं सांगितली संघर्षगाथा...

सकाळ डिजिटल टीम

सध्या चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपटाचा बोलबोला आहे. ''कांतारा'' या चित्रपटाने तर सर्व रेकॉर्ड मोडत जगभरात 200 कोटींहुन जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू व्हर्जनमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तर, IMDb वरही सिनेमाने जादू दाखवली आहे. या सिनेमाला 9.4 रेटिंग मिळालं आहे.

कन्नड सिनेसृष्टीतच काय तर सर्व जगभरात सध्या या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ''कांतारा'' चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असा 'ऑल राउंडर' असणारा रिषभ शेट्टी नेमका आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलचं तर याच उत्तर आम्ही तुम्हाला सांगतो.

कोणताही अभिनेता एका रात्रीतच जेव्हा स्टार म्हणून ओळखला जातो तेव्हा त्याच्यामागे त्याची अफाट मेहेनत असते. अभिनेता शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान,अक्षय कुमार हे अभिनेते स्टार म्हणून ओळखले जातात. त्याच प्रमाणे राजकुमार राव, नवाजुद्दीन, पंकज त्रिपाठी या अभिनेत्यांनी देखील मेहनत, संघर्ष करून सिनेसृष्टीत स्वतःचे  वेगळे स्थान निर्माण केले आहे. या अभिनेत्यांप्रमाणेच ''कांतारा'' या चित्रपटामूळे आज जगाच्या कानोकोपऱ्यात एकच नाव लोकांच्या ओठावर आहे आणि ते म्हणजे रिषभ शेट्टी.

केजीएफ या चित्रपटाला मागे टाकत ''कांतारा'' हा चित्रपट सुपरहिट होताना दिसत आहे आणि याच संपूर्ण श्रेय लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीला जातं. रिषभ शेट्टी याने करियरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. एका मुलाखतीत त्याने स्वतः बद्दलची माहिती दिली.

त्या मुलाखतीत त्याने सांगितले, मी सुद्धा बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलो होतो. सुरुवातीला मला छोटी मोठी कामे करावी लागली. लोकल कोऑर्डिनेशन पासून तर निर्मात्यांचा ड्रॉयव्हर म्हणून मी काम केलं. मला संकलनामध्ये आवड होती मात्र मला काम मिळत नव्हते. शेवटी मी पुन्हा गाव गाठलं आणि कांताराची कथा लिहिण्यास सुरुवात केली. रिषभाचा 'सायनाईड' हा २००६ मध्ये आलेला चित्रपट सुपरहिट ठरला.

त्या चित्रपटानंतर मात्र त्याला लगेच काम मिळालं नाही. त्यानंतर त्याने 'नाम ऐरोली ओनिडा' या चित्रपटात त्याने २०१० साली काम केले. याचदरम्यान त्याची मैत्री राकेश शेट्टी सोबत झाली. राकेश शेट्टी हा टीव्ही मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्या दोघांनी मिळून २०१४ साली 'उलीदवरू कांदंठे' हा चित्रपट केला.हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर किरिक पार्टी, सा.हाय.प्रा.शाले. कासारगोडू असे चित्रपट रिषभने दिग्दर्शित केले.त्यानंतर त्याला २०१९ मध्ये ६६व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

कांतारा नेमका कसा घडला?

याबद्दल रिषभने एका मुलाखतीत सांगितले कि दोन मुद्दे त्याच्या कथेसाठी टर्निंग पॉईंट होते. ते म्हणजे १९८० मध्ये वन संवर्धन कायदा लागू झाल्यानंतर अतिक्रमण आणि शिकार या मुद्यांवर गावकरी आणि वनविभाग यांचा एक संघर्ष सुरु झाला. एक माणूस रानडुकराची शिकार करतो कारण त्या जनावराने त्याच्या शेतीचं नुकसान केलेलं असत. रिषभ हा कर्नाटकात वाढला आहे. त्यानंतर त्याच्यापुढे दोन पात्रे उभी राहिली ती म्हणजे गावकरी आणि वनविभाग अधिकारी. त्यानंतर त्याने भूत कोला हा सण आणि देवदेवतांच्या भूमिकेचा विचार केला.

सिनेमाचं कथानक घनदाट जंगलात फिरत राहतं. 'भूत कोला' नृत्य नर्तक कलाकार म्हणजेच 'कोला'. द्वारपाल म्हणून हे भगवान 'वराह'च्या सर्व भक्तांचं प्रत्येक वाईट आत्म्यांपासून एकवचनी रक्षण पूर्वापार प्रथेप्रमाणे करत आल्याचे या चित्रपटात पाहायला मिळतं. त्यानंतर रिषभ म्हणाला की, ‘मला नेहेमीच माहिती होतं कि माझ्याकडे एक चांगली कथा आहे जी प्रेक्षकांना आवडेल. हि एक अशी कथा आहे जी सगळ्यांशी कनेक्ट करू शकेल. जेव्हा मी चित्रपट बनवतो तेव्हा त्यामागचा पहिला विचार असा असतो कि त्याचा मला कंटाळा येऊ नये.’

आकांक्षा मानकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

SCROLL FOR NEXT