Spider-Man star Tom Holland opens up about battling alcoholism esakal
मनोरंजन

Spider Man : 'स्पायडर मॅन'ला दारुशिवाय काही सुचत नव्हतं!

ज्यांनी टॉम हॉलंडचा स्पायडर मॅन पाहिला असेल त्यांना त्याच्या भूमिकेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही.

युगंधर ताजणे

Spider-Man star Tom Holland opens up about battling alcoholism: ज्यांनी टॉम हॉलंडचा स्पायडर मॅन पाहिला असेल त्यांना त्याच्या भूमिकेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. हॉलीवूडमध्ये आपल्या नावानं टॉमनं त्याची वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. लहानपणापासून चित्रपटांची आणि अभिनयाची आवड असणाऱ्या टॉमची एक मुलाखत सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

हॉलंडनं त्याच्या मद्यपानाच्या सवयीविषयी सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या शेकडो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपण त्यावेळी मद्याच्या प्रचंड आहारी गेलो होतो आणि त्याशिवाय दुसरे काही सुचतच नव्हते. अशा शब्दांत टॉमनं त्याच्या गतकाळाविषयी सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या त्या आठवणींविषयी चाहत्यांनी त्याला अधिक बोलतं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावूनही सोडले आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

आपण मद्यपानाची सवय कशी बंद केली याविषयी टॉमनं यावेळी सांगितले आहे. त्यात तो म्हणतो, मी पहिल्यांदा एक महिनाभर दारुला हात लावायचा नाही. असे ठरवले. आणि तो नियम काटेकोरपणे पाळला. मला खूप त्रासही झाला होता. पण जे ठरवले त्याला तडा जाऊ दिला नाही. यावेळी माझ्या मानसिकतेचा कस लागला होता. नंतर त्या गोष्टीचे मला फायदेही जाणवू लागले. मला चांगली झोप लागली, माझ्या प्रकृतीत सुधारणाही झाली.

जे शेट्टीच्या पॉडकास्टमध्ये हॉलंड सहभागी झाला होता. यावेळी त्यानं आपल्या वाईट सवयी आणि शेवटी त्यावर केलेली मात याविषयी तो दिलखुलासपणे बोलला. त्याच्या त्या पॉडकास्टचे कौतूक होताना दिसत आहे. आमच्या घरात दारुची सवय कित्येक मोठया माणसांना होती. मात्र त्यात कुणी वाहवत गेले नव्हते. माझ्याबाबत मात्र झाले ते उलटेच. काही काळ मी वाहवत गेलो. पण आता पुन्हा जागेवर आल्याचे स्पायडर मॅन फेम हॉलंडने सांगितले आहे.

एकदा तुम्हाला अल्कोहोलची सवय लागली की मग ती सुटणे कठीण गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला खूपच खंबीर असावे लागते. तुमच्या मानसिकतेचा कस लागतो. यासगळ्यावर मला खूपच मेहनतीनं मात करता आली. लोकं तुमच्याकडे पाहतात, तुमचा आदर्श घेतात. अशावेळी तुमची जबाबदारीही वाढीस लागते. असंही हॉलंडनं यावेळी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT