top 10 movies dilip kumar file image
दिलीप कुमार यांचा शबनम हा चित्रपट 1949 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिभूती मित्रा यांनी केले आहे. या चित्रपटाचे कथानक रंगूनच्या लढाईवर आधारित आहे.दिलीप कुमार यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे मुघल- ए- आजम. या चित्रपटामध्ये दुर्गा खोटे, दिलीप कुमार, पृथ्वीराज कपुर यांनी काम केले होते. हा चित्रपट1960 मध्ये प्रदर्शित झाला होता.'गंगा जमना' हा चित्रपट 1961 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची लेखन आणि निर्मिती स्वत: दिलीप कुमार यांनी केली होती. वैजंतीमाला आणि दिलीप कुमार यांनी या चित्रपटामध्ये अभिनय केला होता.1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या राम और श्याम या चित्रपटाचे दिग्दर्शन तापी चाण्यक्य यांनी केले होते. दिलीप कुमार, प्राण, वहिदा रेहमान, मुमताज, निरूपा रॉय या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे.'नया दौर' हा चित्रपट 1957 मध्ये ब्लॅक अॅण्ड व्हाईट स्वरूपात प्रदर्शित करण्यात आला. पण 3 ऑगस्ट 2007 मध्ये तो कलर स्वरूपामध्ये पुन्हा रिलीज केला. या चित्रपटामध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत वैजंतीमाला आणि अझित- जिवन यांनी काम केले आहे. 1958 मध्ये प्रदर्शित झालेल्या मधुमती चित्रपटामध्ये दिलीप कुमार आणि वैजंतीमाला यांच्या जोडीला पसंती मिळाली होती. या चित्रपटाची कथा शैलेंद्र यांनी लिहीली आहे. देवदास या चित्रपटामधील दिलीप कुमार यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले आहे. हा चित्रपट 1955मध्ये प्रदर्शित झाला. उरन घटोला हा चित्रपट 1955 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील प्रमुख भूमिका दिलीप कुमार यांनी साकारली. दिलीप कुमार सोबतच निम्मी, जिवन, टुन टुन या कलाकरांनी देखील चित्रपटमध्ये काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. यू. सनी यांनी केले आहे.
दीदार या चित्रपटामधील दिलीप कुमार आणि अशोक कुमार या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटाचे कथानक एका तरूण मुलाच्या आय़ुष्यावर आधरित आहे.
1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या क्रांती या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटातील मेरे देश की धरती हे गाणे खूप लोकप्रिय झाले.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.