Lata Mangeshkar death updates esakal
मनोरंजन

Lata Mangeshkar: गानकोकीळा लता दीदींचं प्रत्येक गाणं सुपर हिट होतं अन् राहिल...

भारताची गानकोकीळा अशी लता मंगेशकर यांची विशेष ओळख...

सकाळ डिजिटल टीम

स्वर कोकिळा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी 1942 मध्ये सिने करिअरला सुरुवात केली. भारतरत्न गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांची अनेक गाणी (Lata Mangeshkar Marathi Songs) अजरामर आहेत. सुमधूर सुरांनी त्यांनी या गाण्यांमधून संपूर्ण विश्वालाच वेड लावलं आहे. म्हणूनच त्यांना जगभरात गानकोकीळा या नावाने ओळखलं जातं. लतादिदींनी आतापर्यंत मराठी, हिंदी अशा एकूण वीस भाषांमध्ये विविध प्रकारची गाणी गायली आहेत. खरंतर त्यांची सर्वच गाणी सुपरहिट आहेत. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके, राजीव गांधी सद्भावना पुरस्कारासह अनेक पुरस्कार पटकावलेल्या लतादीदींनी हजारो गाणी गायली आहेत. लता दीदींच आज सकाळी आठच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या.

लता मंगेशकर

लता दीदींनी गायलेली मराठी गाणी...

- गजानना श्री गणराया

- चिंब पावसानं रान झालं आबादानी

- ऐरणीच्या देवा तुला

- आज गोकुळात रंग खेळतो हरी

- लटपट लटपट तुझे चालणे

- मोगरा फुलला

- मी रात टाकली

- मेंदीच्या पानावर

- चाफा बोलेना

लता मंगेशकर

लता दीदींनी गायलेली हिंदी गाणी...

- ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी - दिदीच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग २७ जानेवारी १९६३ रोजी त्यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत गाऊन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित-जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आणले.

- लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो (साधना)

- प्यार किया तो डरना क्या (मुगल-ए-आजम)

- आप की नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे (अनपढ़)

- ये जिंदगी उसी की है, जो किसी का हो गया (अनारकली)

- तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं (मासूम)

- आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है (गाइड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT