trailer released of Hindi movie Thappad starring Tapasee Pannu 
मनोरंजन

Thappad Trailer : 'उसने मुझे मारा, पहली बार; नहीं मार सकता!'

सकाळ डिजिटल टीम

पिंक, मुल्क, सांड की आँख अशा दर्जेदार चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणाऱ्या तापसी पन्नूने पुन्हा एकदा टीकाकारांना 'थप्पड' दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'थप्पड' चित्रपटाचं ट्रेलर आज रिलीज झालं आणि काही वेळातच सोशल मीडियावर ट्रेंडही झालं. 

छानसा संसार, एकमेकांवर असलेलं अपार प्रेम, कुटूंबाची काळजी, एकमेकांना सांभाळून घेणं असे आदर्श गुण असलेलं जोडपं.. एक दिवस त्यांचा संसार चांगला सुरू असताना आनंदाच्या क्षणीच त्याच्यावर विरजण पडतं. नवरा बायकोला एक सर्वांसमोर कानाखाली देतो आणि तिथूनच जागी होते तिच्यातली स्त्री! एका थप्पडमुळे ती घटस्फोट देण्यासाठी निघते. अनेक अडथळे येतात, घरचे समजावून सांगतात पण ती कोणाचंच ऐकत नाही. एक थप्पडमुळे तिचं आयुष्यच बदलून जातं. थप्पड हे घटस्फोट घेण्यासारखं कारण नाही, हे तिला अनेकजण समजावून सांगतात, बाईकडे सहनशक्ती हवी असेही सल्ले तिला मिळतात, पण ती थप्पड हे केवळ कारण नसून आतापर्यंत सहन करत आलेला सगळा अपमान बाहेर पडतो आणि ती पुढे काय निर्णय घेते, यावर या चित्रपटाची गोष्ट साकारली आहे. 

तापसी पन्नू अम्रिता साकारली आहे, तर पवेल गुलाटीने पतीची भूमिका साकारली आहे. याशिवाय तन्वी आझमी, रत्ना पाठक, नाईला गरेवाल यांच्याही मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. 

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी कथेला न्याय दिलाय. एका स्त्रीमधल्या स्त्रीत्वाची ओळख या दिग्दर्शकाने करून दिली आहे. 28 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT