अजय देवगण (Ajay Devgan)आणि काजोलची(Kajol) मुलगी सोशल मीडियावर अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. अर्थात तिचं इन्स्टाग्राम प्रोफाईल तिनं प्रायव्हेट ठेवलं असलं तरी तिच्या मित्र-मैत्रिणींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं तिची झलक पहायला मिळतेच. दोन-तीन दिवसांपूर्वी तिचे एका पार्टीतले फोटो भलतेच चर्चेत आले होते. त्यात तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतचे तिचे ते बोल्ड आणि बिनधास्त फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कदाचित न्यासा देवगण पहिल्यांदाच अशा अवतारात दिसल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या असाव्यात.(Trolls talking about Nysa Devgn’s skin tone and calling her ‘plastic’)
न्यासा देवगणला तिच्या रंगावरुन ट्रोल केलं गेलं आहे. पण काळी-सावळी दिसते म्हणून नाही तर तिचा स्किन टोन त्या फोटोत आधीपेक्षा उजळलेला दिसला म्हणून. एका नेटकऱ्यानं लिहिलंय,'ये गोरी कैसे हो गयी'. तर दुसऱ्या एकानं चक्क म्हटलंय की,'काजोलची मुलगी प्लॅस्टिकपासून बनलीय वाटते,तिचा लूक तसाच दिसतो आहे'. एकानं तर हद्दच केली. म्हणाला,'चला,न्यासा स्क्रीन व्हाइटनिंग सर्जरी करुन तिच्या मित्रांसोबत पार्टीसाठी तयार आहे. पण तिनं कितीही रुप बदललं तरी लोक तिला सिनेमात सहनच करु शकत नाहीत'.
पण या विरोधातल्या प्रतिक्रियांना काही नेटकऱ्यांनीच खडसावणाऱ्या भाषेत उत्तर दिल आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'एका १९ वर्षांच्या मुलीच्या रंगावरनं आणि लूकवरनं सोशल मीडियावर कमेंट करणं हे योग्य नाही. हे तिच्या मनावर चुकूचा परिणाम करु शकते. ती तिचं आयुष्य जगतेय,तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत आयुष्याचा आनंद घेतेय,मग आपण कशाला उगाचाच तिच्या सौंदर्याला मोजमाप लावायचे? तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं न्यासा देवगणची बाजू मांडत लिहिलं आहे,कोणालाही त्याच्या रंगावरनं,दिसण्यावरनं चिडवण चुकीचं आहे. ती तिचं आयुष्य एन्जॉय करतेय मग आपण ता तिला उगाचच तिच्या रंगावरनं हिणवायचं? कोणालाही त्याच्या रंगावरनं नावं ठेवणं हे अतिशय खेदजनक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.