Tusshar Kapoor said Red carpet isn’t laid out for every star kid, waited for 12-14 hrs for Kareena sakal
मनोरंजन

Tusshar Kapoor: मी स्टार कीड असूनही करीनाने मला.. तुषारने सांगितलं बोलीवूडचं सत्य

करीनाची तासनतास वाट पाहत बसायचा तुषार कपूर, जाणून घ्या काय होतं कारण..

नीलेश अडसूळ

tusshar kapoor: अभिनेता तुषार कपूर हे बॉलीवूड मधील महत्वाचं नाव. आज जरी हे नाव फार चर्चेत नसले तरी एकेकाळी तुषार कपूरचा बॉलीवूडमध्ये चांगलाच दबदबा होता. त्याने अनेक चित्रपट हिट केले आहेत. सध्या अभिनयापलीकडे जाऊन तो निर्मिती क्षेत्रात कार्यरत असल्याचे पडद्यामागे त्याचे योगदान अधिक आहे. शिवाय तो एकल पिता असल्याने सगळ्यांचे लक्ष त्याच्या भूमिकांकडे असते. लवकरच तो 'मारीच' या चित्रपटात झळकणार आहे. पण आज त्याने एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणजे निपोटिझम..

(Tusshar Kapoor said Red carpet isn’t laid out for every star kid, waited for 12-14 hrs for Kareena)

सध्या बॉलीवुडमध्ये सर्वाधिक वाद होतात ते 'नेपोटिझम' या विषयामुळे. कलाकारांची मुळे चित्रपट क्षेत्रात येऊन मोठी होतात पण सामान्य घरातून आलेल्या कलाकारांना मात्र याचा मोठा फटका बसतो. पण सर्वच कलाकार 'नेपोटीझम' मध्ये येत नाही असं तुषार कपूरचं (tusshar kapoor)म्हणणं आहे. कारण हा अनुभव त्याचा स्वतःचा आहे.

बॉलिवूड कलाकारांची मुळे आईवडिलांपाठोपाठ चित्रपटात येतात. अशा स्टार किड्सला चटकन प्रसिद्धी मिळते. त्यांना इतर कलाकारांसारखा संघर्ष करावा लागत नाही. अशी कित्येक नावे आपल्याला सहज सांगता येतील. त्यापैकीच एक म्हणजे तुषार कपूर. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांना तुषार कपूर आणि एकता कपूर ही दोन मुले. तुषार आणि एकता दोघेही मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. पण कलाकारांच्या मुलांना संघर्ष करावा लागत नाही, यावर तुषार कपूरने आक्षेप घेतला आहे. तो म्हणतो खरे सत्य काही वेगळेच आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तुषार कपूरला नेपोटीझम विषयी विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, 'मी प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा आहे. मात्र, असे असूनही त्याला स्टार किड असल्याचा कोणताही लाभ मिळाला नाही. इंडस्ट्रीमध्ये सर्व स्टारकिड्ससाठी ‘रेड कार्पेट’ असते असे नाही. मी 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात माझ्यासोबत अभिननेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, स्टार किड असतानाही मला करिनाची तासनतास वाट पहावी लागायची. त्यावेळी करीनाने एकाच वेळी चार चित्रपट करत होती. त्यामुळे टी सेटवर 12 ते 14 तास उशिरा यायची आणि तेवढा वेळ मी वाट पाहत बसायचो.' असे वास्तव तुषारने मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT