Hardeek Joshi instagram
मनोरंजन

'आजही तुझी उणीव जाणवते'; हार्दिक जोशीची भावूक पोस्ट

'बडी'सोबतचे काही फोटोसुद्धा राणा दाने सोशल मीडियावर पोस्ट केले.

स्वाती वेमूल

'तुझ्यात जीव रंगला' tuzhyat jeev rangla या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. रांगडा राणा दा आणि अंजली म्हणजेच पाठकबाईंचा सुरेख प्रवास चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेत राणा दाची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी hardeek joshi सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या सतत संपर्कात असतो. इन्स्टाग्रामवर तो विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत आणि त्यासोबतच एका भावूक पोस्ट लिहिली आहे. हार्दिकचा पाळीव श्वान 'बडी' याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने हार्दिकने ही खास पोस्ट लिहिली आहे. (tuzhyat jeev rangla fame hardeek joshi aka rana da emotional post for his buddy)

'बडी तुला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं. तुझी कमी आजही आम्हाला नेहमी जाणवते. तू कायम आमच्याबरोबर आहेस आणि कायम राहणार', अशी पोस्ट त्याने लिहिली. बडीसोबतचे काही फोटोसुद्धा त्याने पोस्ट केले. पाळीव प्राण्यांमध्ये माणसाच्या सर्वांत जवळचा असलेला प्राणी म्हणजे श्वानच. माणसाचा खरा आणि प्रामाणिक साथीदार अशी अनेक विशेषणं त्याला लावली जातात. हार्दिकसाठीही त्याचा बडी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.

दरम्यान मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर हार्दिकने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर बदाम थंडाईचा व्यवसाय त्याने सुरू केला असून याबद्दलची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे दिली होती. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. राणा आणि पाठकबाई यांची केमिस्ट्री व प्रेमकहाणीसुद्धा त्यांना भावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT