ऑनलाईन शॉपिंग(Online Shopping) किंवा व्यवहार हा सगळ्यांना जिव्हाळ्याचा प्रश्न झाला आहे. सर्वसामान्यच काय तर छोट्या-मोठ्या पडद्यावरचे सेलिब्रिटीही या ऑनलाईन शॉपिंग-व्यवहाराच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतात. वेळेची बचत किंवा झटपट काम हे एकमेव कारण यामागचं. पण मग जेव्हा हिच ऑनलाईन शॉपिंग किंवा व्यवहार करताना हजारो,लाखोचा गंडा लागतो तेव्हा मात्र सर्वांचे डोळे खाडकन उघडतात. नुकतेच एक टेलीव्हिजन अभिनेत्री(Television Actress) Online Fraud च्या फसवणूकीला बळी पडली आहे. अमन संधू(Aman Sandhu) असं या टी.व्ही अभिनेत्रीचं नाव आहे. तिने शनिवारी गोरेगाव पोलिस स्टेशनात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. (TV actress Aman Sandhu became a victim of online fraud, Goregaon police registered a case)
अमन संधू हिला ४०-५० हजारांना नाही तर २.२४ लाखांना चोरांनी गंडा लावल्याचं बोललं जात आहे. अमन संधू आपल्या आईसोबत गोरेगाव वेस्ट मध्ये राहते. अभिनेत्री अमन संधूनं दावा केला आहे की ती आपल्या आईसाठी जुहूच्या क्रिटी केअर हॉस्पिटलच्या वेबसाइटवर हाडांच्या सर्जनची अपॉइंटमेंट बूक करण्याचा प्रयत्न करत होती. तिनं वेबसाइट शोधून काढली,त्या लिंकवर क्लीक केलं,ज्यामध्ये हॉस्पिटलचा फोटो होता.
अमन संधू म्हणाली,''मी हाडांच्या सर्जनची हॉस्पिटलमध्ये रुग्णांना तपासायला येण्याची वेळ जाणून घ्यायच्या प्रयत्नात होती. कारण माझ्या आईला मला तिथे इलाज करण्यासाठी न्यायचे होते. त्यानंतर संधूने वेबसाईटवर लिहिलेल्या नंबरवर कॉल लावला. तिच्या फोनला समोरुन एका व्यक्तीनं प्रतिसाद दिला आणि त्यानं स्वतःला हॉस्पिटलचा कर्मचारी असल्याचं सांगितलं. अभिनेत्री पुढे म्हणाली की,त्यानं डॉक्टरांची वेळ संध्याकाळी ४ ते ८ ची सांगितली. त्यानंतर त्या व्यक्तीने अमन संधूला सांगितलं की,तिला एक लिंक तो पाठवत आहे. ज्या लिंक वर क्लीक करुन तिथे तिला ५ लाख रुपये जमा करावे लागतील''.
जेव्हा तिने लिंकवर क्लीक केलं तेव्हा तिच्या फोनवर अकाउंटमधनं पाच हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर संधूने फोनवर बोलणाऱ्या त्या माणसाला पैसे डेबिट झाल्याविषयी विचारलं. त्यावेळी त्या माणसाने नकार दिला.पण तेवढ्या वेळात संधूच्या दोन बॅंक अकाउंटमधनं एक-एक लाख डेबिट झाले. अभिनेत्रीनं सांगितलं आहे की,पाच सेकंदाच्या आत तिला २.२४ लाखाचा गंडा लावण्यात आला आहे.
जेव्हा अमन संधूने त्या व्यक्तीला पैशाविषयी विचारलं तेव्हा तो म्हणाला की, तो पैसे परत करेल,आणि त्यानं फोन बंद केला. अमन संधू म्हणाली की त्यानंतर अर्ध्या तासात मी पोलिस स्टेशनात पोहोचले. अधिकाऱ्यांनी आरबीआईला त्वरित फोन लावला आणि पैशाचा व्यवहार थांबवण्यास सांगितले. पण तिच्या फक्त एकाच अकाऊंटमधनं पैशांचा तो व्यवहार थांबवता आला. त्यानंतर संधूने सायबर पोलिस स्टेशनला देखील संपर्क केला. तिची तक्रार दाखल करुन नंतर गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये त्या केसला ट्रान्स्फर केलं. सध्या,गोरेगाव पोलिसांनी यासंदर्भात आय.टी अॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल करुन घेतली आहे. या केससंदर्भात पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.