TV Actress Erica Fernandes shifts to Dubai for work opportunities Instagram
मनोरंजन

Erica Fernandes In Dubai: भारत सोडून दुबईत स्थायिक एरिका फर्नांडिस, व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं 'हे' कारण

'कुछ रंग प्यार के ऐसे भी','कसौटी जिंदगी की 2' या गाजलेल्या मालिकांमधून एरिकानं काम केलंय अन् घराघरात त्यामुळे तिला ओळखलं जाऊ लागलं होतं.

प्रणाली मोरे

Erica Fernandes In Dubai: 'कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली एरिका फर्नांडिस सगळ्यांना माहीतच आहे. पण आता टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री एरिका फर्नांडिस लवकरच भारत सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होणार आहे.खुद्द एरिकाने यामागचं कारण सांगितलं आहे.(TV Actress Erica Fernandes shifts to Dubai for work opportunities)

२०१० मध्ये मॉडेलिंगमधून एरिका फर्नांडिसने स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात केली. याबरोबरच तिने काही दाक्षिणात्य चित्रपटातसुद्धा काम केलं आहे. ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून एरिका घरघरात पोहोचली. एरिकाच्या कुटुंबाचा मनोरंजनसृष्टीशी काहीही संबंध नाही. तिचे वडील बरेच ब्युटी कॉन्टेस्ट आयोजीत करायचे आणि त्यामुळेच तिला मॉडेलिंगची आवड लागली आणि मग तिने याच क्षेत्रात स्वतःचं करिअर करायचं ठरवलं.

एरिका फर्नांडिस लवकरच भारत सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होणार आहे. कारण तिला इतर देशातील मनोरंजन क्षेत्रात नशीब आजमवाचं आहे आणि म्हणूनच तिनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आली आहे. एरिका आता भारत सोडून दुबईमध्ये शिफ्ट होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दुबईच्या एका निर्मात्यानं तिच्याशी संवाद साधलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये खुद्द एरिका फर्नांडिसने दुबईत स्थायिक होण्यामागचं कारण सांगितलं आहे. ती म्हणते, “मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक वळण येतं जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन काहीतरी नवीन अनुभवायचं ठरवतो. आपल्याला आपलं एक नवीन विश्व निर्माण करायचं असतं. मला नाही माहीत की मी पुन्हा भारतात जाईन की इतर कोणत्या देशात, पण तूर्तास दुबई हे माझं घर आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

Ashok Chavhan : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला.....अशोक चव्हाण यांची बाळासाहेब थोरात आणि देशमुखांवर खोचक टीका

Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?

Zimbabwe beat Pakistan: यांना झिम्बाब्वेने हरवले... पाकिस्तानचे ६ फलंदाज ६० धावांत तंबूत, मोहम्मद रिझवाच्या संघाची गेली लाज

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: मुंबई इंडियन्सने 'या' अनकॅप्ड खेळाडूसाठी वापरलं एकमेव RTM कार्ड

SCROLL FOR NEXT