tunisha sharma and shizaan khan sakal
मनोरंजन

Tunisha Sharma: पोलिसांपुढे शिझान ची बोबडी वळली.. संशय बळावला.. पाहा update

सकाळ डिजिटल टीम

टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं शनिवारी टी.व्ही मालिका 'अली बाबा दास्तां ऐ काबुल' च्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषानं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं,तरी मालिकेच्या सेटवर कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत. वयाच्या केवळ विसांव्या वर्षी तिनं अस टोकाचं पाउल का उचललं हाच प्रश्न सर्वांना पडलाय.

यासर्व प्रकरणात पहिला संशय आला तो तुनिषाच्या एक्स बॉयफ्रेंडवर .. या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्यामुळं तुनिशा तणावाखाली होती. त्यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचल्याचं बोललं जात आहे. आत्महत्येनंतर सहकलाकार शीजान खानवर (Sheezan Khan) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होत होता.

त्याचबरोबर याप्रकरणी मोठी कारवाई करत वालिव पोलिसांनी अभिनेत्री तुनिशा शर्माचा सहकलाकार शीजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केलीये. पोलिसांनी (Waliv Police) शीजानविरुद्ध भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

हेही वाचा- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

मात्र शीजान हा पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे. दावा करण्यात येत आहे की शीजान हा पोलिंसाच्या प्रश्नाला उडवाउडवीची उत्तर देत असून त्याचं आणि तुनिशाच्या नात्यात काय बिनंसल ज्यामूळं त्यानी नातं संपवलं याचं उत्तरावरुनही तो स्पष्ट देत नाही आहे.

याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालीव पोलिस हे शीजन याच्या रिमांडची मागणी कोर्टाकडे करणार असून, शीजन आतापर्यंत तपासात सहकार्य करत नसल्याने, भांडणाचे कारण विचारले असता, उलटसुलट वक्तव्य करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT