tehseen poonawala esakal
मनोरंजन

'करार करण्याआधी महिलेसोबत...', तहसीन पूनावालाचा गौप्यस्फोट

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या लॉक अप (Bollywood Actress) नावाच्या शो नं सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Tv Entertainment News: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या लॉक अप (Bollywood Actress) नावाच्या शो नं सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे (Kangana Ranaut) कारण त्या शोमध्ये सहभागी झालेले वादग्रस्त स्पर्धक आणि त्यांची बेताल वक्तव्ये. आतापर्यत पुनम पांडे, सायशा शिंदे यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करुन नेटकऱ्यांना चकीत केले आहे. असाच एक धक्कादायक खुलासा हा राजनीती तज्ञ आणि उद्योजक तेहसीन पूनावालानं केला आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे. कंगनाच्या या शो मध्ये चाहत्यांना असेच वेगवेगळे धक्के दिले आहेत. यापूर्वी कधीही न ऐकलेलं, पाहिलेलं असं भयाण वास्तव कंगनाच्या या शो मधून सहभागी स्पर्धकांनी सांगितले आहे.

पूनावालानं सांगितलं आहे की, मला एक एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे असल्यास महिलेसोबत रात्र घालवण्याची सक्ती केली जात होती. संबंधित महिलच्या पतीनं ठेवलेल्या अटींमुळे याप्रकारची सक्ती केली जायची. लॉक अपमधून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांमध्ये तेहसीन पूनवालांचा समावेश होता. त्याचा त्या शोमध्ये शेवटचा दिवस होता. यावेळी त्यानं धक्कादायक खुलासा करुन खळबळ उडवून दिली आहे.

एक उद्योगपती म्हणून मला काही गोष्टी केवळ समोरच्या व्यक्तीनं सांगितल्या म्हणून कराव्या लागल्या. त्यावेळची परिस्थिती म्हणून मला वेगळे निर्णयही घ्यावे लागले. त्याला दुसरा काही पर्याय नव्हता. यावेळी तेहसीननं सांगितलं की, मला काही करुन सायशाला वाचवायचं होतं. म्हणून मला धक्कादायक खुलासा करावा लागला. तेहसीन त्या शो मधून बाहेर पडणारच होता. त्यावेळी त्याला कंगनानं गेम्सच्या नियमानुसार जाताना एक धक्कादायक खुलासा करुन एका स्पर्धकाला जीवदान देण्याची सवलत दिली होती. त्याचा वापर करुन त्यानं ही गोष्ट सगळ्यांना शेयर केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT