Twinkle Khanna Review: बॉलिवूड अभिनेत्री ट्वींकल खन्ना सोशल मीडिया कायम ऍक्टिव्ह असते. ट्वींकल खन्नाने तिचा सोशल मीडिया अल्टर इगो, बाबा ट्विंकदेव या नावाने सोशल मीडियावर लिहीत असते.
ट्वींकल खन्नाने गुरुवारी तिच्या फॅन्सना नातेसंबंधात टॉयलेटच्या सवयींचे किती महत्त्व आहे असं विचारले. ट्वींकल खन्नाने सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
पिवळ्या सनग्लासेससह गुलाबी प्रिंटेड शर्ट परिधान करून, ट्विंकलने इंस्टाग्रामवर सांगितले, "बाबा ट्विंकदेव ज्ञान शेअर करत आहेत.
दुसऱ्या व्यक्तीचा आनंददायी स्वभाव आणि छान हसण्याने मोहित झालेली माणसं वारंवार हे विसरतात की त्यांना फक्त बेडच नाही तर पार्टनरच्या टॉयलेट सवयी देखील एकत्र करायच्या आहेत.
प्रेमाच्या बाबतीत टॉयलेटच्या सवयी महत्त्वाच्या आहेत?" असं लिहीत ट्विंकलने तिच्या फॅन्सना त्यांचा अनुभव शेयर करायला सांगितलाय.
या कॅप्शनसोबत ट्विंकलने एक पोस्ट केली आहे. ज्यात ती म्हणते, "इट ऑल गोज डाऊन टॉलेट - आयुष्यभर व्यक्तीच्या प्रेमात राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पटकन मरणे.
मला वाटते की तुम्हाला फक्त एका आठवड्यात तुमची टॉयलेट सीट कायम वर असते त्यावरून अनेक गोष्टी कळतात." अशी पोस्ट करून बाबा ट्विंकदेव या नावाने ट्विंकल खन्नाने पोस्ट शेयर केलीय.
काहीच दिवसांपूर्वी ट्विंकल खन्नानं आपली मुलं आणि त्यांच्या पालनपोषणाविषयी देखील आपली मतं मांडली. ती म्हणाली की, ''मुलांचं संगोपन करताना त्यांना कोणत्याही गोष्टीचं उदाहरण देत समजावनू सांगणं खूप महत्त्वाचं आहे.
आजकाल मुलींना वाढवताना जितकं डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं जातं तेवढं मुलांना वाढवताना केलं जात नाही या प्रश्नावर ट्विंकल खन्ना म्हणाली, ''मी मुलांचं संगोपन योग्य पद्धतीनं कसं करावं यावर एक कॉलम लिहिला होता''.
''फक्त मुलींचं संगोपन करताना जास्त लक्ष द्यावं आणि मुलांकडे लक्ष देऊ नये हे मला पटत नाही.
जर मला कुणी विचारेल तर मी सांगेन की,जसं तुम्हाला ट्रेनिंग देऊन, टेस्ट पास केल्यावरच गाडीचं लायसन्स मिळतं तसंच आई-वडील होऊ इच्छिणाऱ्यांना देखील बाळाला जन्म देण्याआधी ट्रेनिंगची गरज आहे''. अशाप्रकारे ट्विंकल खन्नाने तिचं परखड मत स्पष्ट केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.