actress urmila matondkar tweeted on uddhav thackeray  sakal
मनोरंजन

उद्धव ठाकरेंसाठी उर्मिला मातोंडकर गहिवरल्या.. म्हणाल्या, तुमचे नेतृत्व..

मनोरंजन विश्वातून उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता.२९) फेसबुक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधून राजीनाम्याची घोषणा केली. तसेच त्यांनी आपल्या मंत्र्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन राजीनामा पत्र सुपुर्द केले. यावेळी अनिल परब, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अजय चौधरी, निलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. (Uddhav Thackerayji Thank You, Urmila Matondkar Reaction After Maharashtra CM Resignation) (actress urmila matondkar tweeted on uddhav thackeray)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यावर प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी (Urmila Matondkar) ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये उर्मिला मातोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या शिवसेनेच्या प्रसार प्रचारातही सक्रिय असतात. शिवाय सध्या महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत उर्मिला यांचेही नाव होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचा त्यांनाही मोठा फटका बसला आहे. शिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्याने त्यांनी आपले दुःख ट्विट दावरे व्यक्त केले आहे.

'धन्यवाद उद्धव ठाकरेजी. तुमच्या नेतृत्वामुळे आपले राज्य जातीयवाद आणि द्वेषापासून दूर राहिले. तुमचे नेतृत्व अनुकरणीय, पूराग्रहरहित, धाडसी, प्रतिक्रियात्मक, पारदर्शी, संवादप्रिय होते. जय महाराष्ट्र !' असे भावनिक ट्विट त्यांनी केले आहे. काल सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणामध्ये रात्री ९ वाजता निकाल देत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन आपण राजीनामा देत असल्याचे कळवले. त्यानंतर विविध स्तरारतून उद्धव ठाकरे यांना समर्थन मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT