Cannes 2022 : फ्रान्समध्ये ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवला मंगळवारी सुरुवात झाली. यावेळी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी एका देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावली आणि उपस्थित सगळेच अवाक झाले. ही व्यक्ती होती युक्रेनचे अध्यक्ष वोलदमिर झेलेन्स्की. यावेळी झेलेन्स्की यांनी उपस्थितांना संबोधित करताना युक्रेन आणि रशिया युद्ध आणि सध्यस्थितीबाबत भाष्य केले. (Cannes Film Festival begins with Ukrainian President Volodymyr Zelensky’s call to speak out against war)
या महोत्सवात ते चित्रपट आणि वास्तव यांच्यातील संबंधांबद्दल बोलत होते. रशियाचा सामना करणाऱ्या युक्रेनच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची विनंती झेनेन्स्की यांनी चित्रपटसृष्टीला केली आहे. फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या 'अपोकॅलिप्स नाऊ' आणि चार्ली चॅप्लिनच्या 'द ग्रेट डिक्टेटर' सारख्या चित्रपटांचा संदर्भ देत युक्रेनची सध्याची परीस्थिती उपस्थितांसमोर मांडली.
झेलेन्स्की यांनी कॉमेडियन चार्ली चॅप्लिन यांचा आवर्जून उल्लेख केला. तसेच 'द ग्रेट डिक्टेटर' या चित्रपटातील काही भाग त्यांनी वाचून दाखवला. 'एक दिवस हुकूमशहा लयाला जातील आणि त्यांनी हिसकावलेली सत्ता सामान्य जनतेकडे परत जाईल' असे मार्मिक भाष्य यातून त्यांनी केले. चार्ली चॅप्लिनच्या जर्मन हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरवरील व्यंगचित्राबाबतही ते बोलले. यावेळी 'आजच्या काळातला आमचा चित्रपट गप्प बसणारा नाही, हे दाखवण्यासाठी आपल्याला आता एका नवीन चॅप्लिनची गरज आहे.' असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.