Ukranian singer booked for allegedly disrespecting For Insulting India's Flag At Pune Concert  Esakal
मनोरंजन

Ukrainian singer Uma Shanti: प्रसिद्ध गायिकेवर पुण्यात गुन्हा दाखल ! काय आहे नेमकं प्रकरण

Vaishali Patil

Uma Shanti: देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगळवारी सर्वत्र तिरंग्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी देशभरात अनेक ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र पुण्यात अशाच एका कार्यक्रमात तिरंग्याचा अवमान झाल्याची बातमी समोर आली आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांनी युक्रेनची लोकप्रिय गायिका उमा शांती हिच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

पुण्यातील मुंडवा येथील एका क्लबमध्ये कार्यक्रमादरम्यान गायिका उमा शांती हिने भारताच्या राष्ट्रध्वजाचा अनादर केला आहे. तिच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

ही घटना रविवारी रात्री घडली आहे जी कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. नंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर मीडियावर व्हायरल झाला.


एफआयआरनुसार, शांती जी युक्रेनियन बँड शांती पीपलची प्रतिनिधी आहे ती तिच्या दोन्ही हातात तिरंगा घेऊन नाचली आणि नंतर तिने ते झेंडे प्रेक्षकांच्या दिशेने फेकले.

सोशल मीडिया उमाचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. बँड शांती पीपलची मुख्य गायिका उमा आणि तानाजी देशमुख यांच्याविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

तिने भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यामुळे या व्हिडिओवर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणी गायक आणि कार्यक्रमाचे आयोजक यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच गायक आणि आयोजकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.

या प्रकरणी गायक आणि कार्यक्रमाचे आयोजक यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच गायक आणि आयोजकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.

शांती पीपल हा युक्रेनियन बँड गेल्या काही दिवसांपासून भारताच्या दौऱ्यावर आहे. गेल्या आठवड्यात बेंगळुरू आणि भोपाळमध्ये त्यांनी लाईव्ह शो केले होते. या बँडचा दुसरा परफॉर्मन्स रविवारी पुण्यात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT