NCPCR Latest News 
मनोरंजन

Ullu App News : 'उल्लू ॲप' च्या 'कंटेट' मुळे मुलांवर होतोय विपरित परिणाम, बाल हक्क आयोगाचं माहिती प्रसारण मंत्रालयाला पत्र!

युगंधर ताजणे

Ullu Apps latest news : राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग अर्थात एनसीपीसीआरने आता केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला एक मोठं पत्र लिहून त्यात लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी चिंता व्यक्त केली आहे. आयोगानं उल्लू नावाच्या ॲपच्याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा. अशी मागणी त्या पत्रातून करण्यात आली आहे.

उल्लू ॲपवरुन जो कंटेट प्रसारित केला जात आहे त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे. त्या ॲपवरील कंटेट हा सहजासहजी मुलांना पाहता येतो आहे.त्यावर कोणत्याही स्वरुपाची बंधनं नाहीत. त्यामुळे त्या ॲप्सच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आयोगानं आपल्या पत्रातून केली आहे. एनसीपीसीआरनं माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून आगामी काळातील परिणांविषयी चिंता व्यक्त केली आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

भविष्यात उल्लू सारख्या ॲप्सच्या माध्यमातून जो कंटेट प्रदर्शित होतो आहे त्यामध्ये अश्लील कंटेटचा भरणा जास्त आहे. जो मुलांना सहजरीत्या पाहता येत आहे. या ॲपप्ससाठी विशिष्ट नियमावली आणि बंधनं घालण्यात यावी असेही त्या पत्रामध्ये म्हटले गेले आहे.

आणखी काय आहे त्या पत्रात?

शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनावर त्या उल्लू ॲपचा विपरित परिणाम होतो आहे. त्यावर वेळीच बंधनं आणली गेली नाहीत तर त्या विद्यार्थ्यांची मानसिकतेला धोका पोहचू शकतो. पत्रात नमूद केल्यानुसार उल्लु अॅप हे सध्या कोणत्याही केवायसी पॉलिसी शिवाय वयाचे व्हेरीफिकेशनच्या नियमांचे पालन न करता सहजासहजी इंस्टॉल करता येत आहे. त्यांनी कोणत्याही गाईडलाईन्सचे पालन केलेलं नाही. एवढेच नाही तर पोक्सो कायद्याचे देखील उल्लंघन केल्याचे त्या पत्रात म्हटले गेले आहे.

बॉलीवूडच्या सेलिब्रेटींकडूनही तक्रार..

यापूर्वी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला बॉलीवूडच्या काही प्रसिद्ध सेलिब्रेटींकडून देखील एक तक्रार प्राप्त झाली आहे. त्या म्हटलं गेलं आहे की, उल्लू अॅप जे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे त्यावर प्रेक्षकांसाठी (ग्राहकांसाठी) खूप मोठ्या प्रमाणात अश्लील कंटेट आहे. तो कंटेट लहान मुलांकडूनही पाहिला जात आहे.

तक्रारकर्त्यानं त्या अॅप्सधील एका शो चा स्क्रीन शॉट शेयर केला आहे. ज्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांबाबत अश्लील कंटेट दाखवण्यात आला आहे. अशा प्रकारे पोक्सोच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्या तक्रारकर्त्यानं म्हटले आहे.

या सगळ्या प्रकरणवार एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कांगो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, उल्लू नावाच्या अॅप हे प्ले स्टोअर आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात अश्लील आणि वादग्रस्त कंटेट आहे. हा कंटेट मुलांना अतिशय सहजरीत्या उपलब्ध असणे ही चिंतेची बाब आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandwad Deola Assembly Elecation: भाजपची यादी जाहीर होताच पेटला दोन भावांमध्ये संघर्ष! राजीनामा देणार अन् मैदानात उतरणार...

Name Change Of Constituency: औरंगाबाद, अहमदनगर, अन् उस्मानाबाद मतदारसंघांची नावे कधी बदलणार? मतदारांच्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळालं

Mahayuti: पाथरी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला, राजेश विटेकर की निर्मलाबाई विटेकर कोण असणार उमेदवार?

Marathwada Rain : पावसामुळे सोयाबीन, मुग, ज्वारीसह कपाशीचेही मोठे नुकसान; शेतकरी चिंतेत

ओबीसी-मराठा वादावर छगन भुजबळांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, 'सर्वच पक्षांत मराठा समाजातील उमेदवार, त्यामुळे..'

SCROLL FOR NEXT