up teacher muzaffarnagar muslim student in private school beaten by classmate bollywood celebrities reaction SAKAL
मनोरंजन

UP Teacher Arrest: "मुझफ्फरनगरमधील त्या शिक्षिकेला अटक करा!"; बॉलिवूड कलाकारांचा तीव्र संताप

मुझफ्फरनगरमधील शिक्षिकेच्या त्या प्रकरणावर बॉलिवूड कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात

Devendra Jadhav

उत्तर प्रदेशमधीस मुझफ्फरनगरमधील खाजगी शाळेत एका शिक्षिकेकडून घडलेल्या अमानुष प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशभरात होत आहे. शाळेतल्या एका मुलाला ५ चा पाढा येत नाही म्हणुन त्या शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांकडून त्या मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

अशातच या प्रकरणावर बॉलिवूड कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. अभिनेते प्रकाश राज, अभिनेत्री रेणुका शहाणे आणि स्वरा भास्कर यांनी ट्विट करुन या घटनेचा निषेध व्यक्त केलाय.

(up teacher muzaffarnagar muslim student in private school beaten by classmate bollywood celebrities reaction)

प्रकाश राज, रेणुका शहाणे लिहीतात...

रेणुका शहाणे यांनी ट्विटरवर लिहिले की, 'त्या नीच शिक्षिकेला तुरुंगात टाकावे! त्याऐवजी, तिला राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळू शकतो! अशा घटनांनी माझ्या प्रिय देशाला रडवा.

याशिवाय प्रत्येक मुद्द्यावर आपले स्पष्ट मत मांडणारे प्रकाश राज यांनीही या घटनेचा निषेध केला आणि हा मानवतेचा 'काळा टप्पा' असल्याचे म्हटले. प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर फोटो कोलाज शेअर करत लिहिले की, "आम्ही मानवतेच्या सर्वात काळ्या बाजूकडे वाटचाल करत आहोत. आम्ही आजकाल घाबरत नाही का?"

स्वरा भास्कर या घटनेचा निषेध करताना लिहीते...

मुझफ्फरनगर येथील पीडित मुलाच्या वडिलांकडून तृप्ता त्यागी नावाच्या शिक्षिकेवर कायदेशीर कारवाई करणार नाही असे लिहून स्वाक्षरी करून घेणे हा आरोपी शिक्षिकेला वाचवण्याचा केवळ प्रयत्न आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा घडल्याचा हा व्हिडिओ पुरावा आहे. मुझफ्फरनगर पोलिस तुम्हाी तुमचे काम करा! अशा कमेंट करत बॉलिवूड कलाकारांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय

काय आहे ही अघोरी घटना ?

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका खासगी शाळेत घडलेल्या प्रकारामुळे वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्याला वर्गातील इतर वर्गमित्र एकानंतर एक असे चापट मारत आहेत. धक्कादायक म्हणजे शिक्षिकाच विद्यार्थ्यांना असं करायला सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये शिक्षिका 'मोहम्मद यांचा मुलगा' असा उल्लेख करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला असून शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

IPL 2025 Mega Auction: लिलाव संपला! १८२ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी खर्च केले ६३९.१५ कोटी रुपये; पाहा खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT