Upendra Kannada Actor Indulged In Controversy : आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असणारा कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र हा सध्या वादात सापडला आहे. उपेंद्र यांने फेसबुक लाईव्ह सेशन दरम्यान दलित समाजाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांमुळे हा वाद निर्माण झाला.
त्याच्या या वक्तव्यामुळे केवळ वादच आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला नाही तर त्याच्याविरोधारत दलित समाजावर टिप्पणी केल्याबद्दल एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. अभिनेता आणि नंतर राजकारणी बनलेल्या उपेंद्र याच्या राजकीय पक्ष प्रजाकीयाच्या वर्धापनदिनानिमित्त तो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाइव्ह आला होता. त्यादरम्यान त्याने हे वक्तव्य केले होते.
त्याच्या प्रजाकिया या त्यांच्या राजकीय पक्षाबद्दल बोलत होता. यावेळी उपेंद्रने दलित समाजाला लक्ष्य करत वादग्रस्त विधान केले आहे.
याच फेसबुक लाईव्ह दरम्यान, त्याने विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. यावेळी तो म्हणाला की प्रजाकिया या आपल्या राजकीय पक्षाबद्दल बोलताना तो म्हणाला की, 'शहर असेल तर त्यात दलितही असतील.
उपेंद्र चा हे वक्तव्य चर्चेत आलं आणि लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. त्याच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र त्यांच्याविरोधात निदर्शने देखील झाली. त्याल होणारा विरोध पाहता त्याने तो व्हिडिओ सोशल मिडियावरुन काढला.
उपेंद्रच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकातील रामनगरात दलित समर्थक संघटनेने निदर्शने केली त्याचबरोबर त्याच्या वक्तव्याचा निषेध म्हणून संघटनेच्या सदस्यांनी उपेद्रचे पोस्टरही जाळले. आता चेन्नम्माना केरे अचुकट्टू पोलिस ठाण्यात उपेंद्रविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
त्याचे पोस्टर जाळणे आणि होणार विरोध त्यातच दाखल झालेली एफआयआर या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उपेंद्रने त्याच्या सोशल मीडियावरुन आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.
यापोस्टमध्ये त्याने लिहिले की, 'मी आज फेसबुक आणि इंस्टाग्राम लाइव्ह मध्ये एक वक्तव्य केलं. त्यामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्याचं मला समजताच, मी माझ्या सोशल मीडियावरून तो लाइव्ह व्हिडिओ हटवला. माझ्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.