UP's Film City Boney Kapoor & Bhutani to build near Noida International Airport  SAKAL
मनोरंजन

Noida Film City: योगींच्या राज्यात उभारणार मुंबईला फाईट देणारी फिल्मसिटी! या निर्मात्याला मिळाली जबाबदारी

Noida Film City Competitor Filmcity to Mumbai; योगींच्या युपीत हा बॉलिवूड निर्माता फिल्मसिटी उभारणार आहे...

Devendra Jadhav

Noida Film City News: योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात मुंबई चित्रनगरीला टक्कर देणारी फिल्मसिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी अक्षय कुमार, बोनी कपूरसह अनेक ग्रुप हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी आघाडीवर होते.

अखेर बॉलिवूड निर्माते बोनी कपूरच्या बेव्यू प्रोजेक्ट्स आणि 'भूतानी ग्रुप' या रिअल इस्टेट कंपनीने आगामी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ यूपी सरकारची महत्त्वाकांक्षी फिल्म सिटी विकसित करण्याचे अधिकार मिळवले आहेत. ज्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः मुंबईत उद्योग प्रतिनिधींची भेट घेतली होती.

यूपी फिल्म सिटी उभारण्यासाठी हे होते दावेदार

युपीत फिल्मसिटी उभारण्यासाठी बोनी कपूर यांच्याव्यतिरिक्त इतर दोन ग्रुप शर्यतीत होते. यामध्ये- T-Series आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा (सुपर टेक्नोबिल्ड) आणि निर्माता केसी बोकाडिया (4 लायन्स फिल्म्स) अशा दोन टीम होत्या. (These were contenders for setting up UP Film City)

पण बेव्यू कंपनीने यूपीमध्ये फिल्मसिटी उभारण्याची ही ऑफर मिळवली आहे.

हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मिळाल्यावर बोनी कपूर म्हणाले की, "फिल्म स्टुडिओ घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. माझा स्वतःचा एक फिल्म स्टुडिओ कधीतरी असावा असे मी नेहमीच स्वप्न पाहत होतो. मला ते आता मिळाले आहे. आत्तापर्यंत मी माझ्या तीन चित्रपटांचे शूटिंग यूपीमध्ये केले आहे. उत्तर प्रदेश हे लवकरच चित्रपट निर्मितीचे केंद्र बनतील. माझे व्यवसायातले भागीदार आणि मी हा प्रोजेक्ट पूर्ण करु. एक स्टुडिओ जिथे एक चित्रपट निर्माता स्क्रिप्ट घेऊन येईल आणि संपूर्ण चित्रपट पूर्ण करेन. फिल्मसिटीपासून 6 किमी अंतरावर नोएडा विमानतळ आहे. त्यामुळे प्रवास करणंही सोपं होईल." असे कपूर म्हणाले.

युपीत हा स्टुडिओ आणि फिल्म इन्स्टिट्यूट तीन वर्षांत तयार होणे अपेक्षित आहे. याशिवाय संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आठ वर्षे लागतील.

सप्टेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेला हा प्रकल्प सुरुवातीला 1,000 एकरवर बांधण्यात आला होता. 2021 आणि 2022 मध्ये दोनदा जागतिक निविदा काढण्यात आल्या. परंतु 7,200 कोटी रुपयांच्या उच्च खर्चाचा प्रकल्प विकसित करण्यासाठी कोणतीही कंपनी पुढे आली नाही. त्यानंतर प्रकल्प आराखडा बदलण्यात आला. आकार कमी करण्यात आला आणि सवलतीचा कालावधी 90 वर्षांपर्यंत वाढविला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT