Shilpa Shetty Husband Raj Kundra Comments on Urfi Javed Dress  esakal
मनोरंजन

Urfi Javed : राजनं उर्फीला बोलायला नको होतं, शिल्पाच्या पतीची तिनं चांगलीच जिरवली, 'जो दुसऱ्यांना...'

टीव्ही मनोरंजन क्षेत्रापेक्षा सोशल मीडियावरच जास्त चर्चेत राहणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये उर्फीचे नाव घेतले जाते.

युगंधर ताजणे

Shilpa Shetty Husband Raj Kundra Comments on Urfi Javed Dress : टीव्ही मनोरंजन क्षेत्रापेक्षा सोशल मीडियावरच जास्त चर्चेत राहणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये उर्फीचे नाव घेतले जाते. एक दिवस असा जात नाही री ज्यादिवशी उर्फीवरुन वाद होत नाही. ती तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत येते. त्यावरुन मोठ्या प्रमाणावर वाद रंगला होता. पण ऐकेल ती उर्फी कसली हे दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वी उर्फीच्या प्रकरणावरुन एका वेगळ्याच राजकीय चर्चेला सुरुवात झाली होती. भाजपच्या महिला पदाधिकारी विरोधात उर्फी जावेद असा तो वाद सोशल मीडियावर रंगला होता. त्यात उर्फीनं भाजप महिला पदाधिकाऱ्याला चांगलेच सुनावले होते. आम्ही कसं राहायचं हे तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्हाला वाट्टेल ती वेशभूषा करु त्यावरुन कुणी काही बोलू नये अशा शब्दांत उर्फीनं तिची भूमिका मांडली होती.

उर्फीनं आता शिल्पाचा पती राज कुंद्रावर आगपाखड केली आहे. त्याला कारण म्हणजे राजनं उर्फीवर केलेली कमेंट. यामुळे उर्फीचा संताप झाला आहे. एका मुलाखतीमध्ये राजला त्याच्या लोकप्रियतेवरुन प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, गेल्या काही दिवसांत मला खूपच वेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. यासगळ्यात मला मोठी साथ लोकांची लाभली. त्यांचा पाठींबा होता. मी आणि उर्फी जावेद आमच्या दोघांना ती साथ मिळत होती.

मी जिथं जाईल तिथे माझ्या तोंडावर मास्क असतो.त्याची मला सवय झाली आहे. माझे कुटूंबीय देखील काही गोंधळात पडताना दिसत आहेत.माझी मुलं ज्यांच्या डोक्यावर हेल्मेट पाहतात त्यांना पपा, पपा अशी हाक मारु लागतात. काही दिवसांपूर्वी मुलं पॉवर रेंजर्स पाहत होते तेव्हा ते त्यांच्या आईला म्हटले की, आई आपले पपा टीव्हीवर आले. त्यानंतर मात्र राजनं जे वक्तव्य केले त्यामुळे तो चर्चेत आल्याचे दिसून आले आहे.

राज म्हणाला, मला जर कुणाकडून सर्वाधिक प्रेम मिळाले असेल तर ते पापाराझ्झींकडून. त्यांनी दोन वर्षात मला खूपच फॉलो केले. मीडियानं मी काय परिधान केले हे जास्त पाहिले. दुसरीकडे उर्फीनं काय परिधान केलं नाही याकडे लक्ष ठेवले. राजचं हे उत्तर उर्फीला आवडलेलं नाही. तिनंही राजला जशास तसे उत्तर दिले आहे.

उर्फी म्हणाली, तिनं इंस्टावरून एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ती म्हणते, दुसऱ्यांना नग्न करुन त्यावरुन पैसे कमावणाऱ्यांनी मला शिकवू नये. सॉरी नॉट सॉरी पॉर्न किंग. अशा सणसणीत शब्दांत उर्फीनं राजला उत्तर दिले आहे. जे चर्चेत आलं आहे. खरंतर राजनं यापूर्वी देखील उर्फीला वेगवेगळ्या कमेंट करुन तिच्याविषयी भाष्य केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT