Urfi Javed Death Rumour,Post Viral Instagram
मनोरंजन

'RIP-उर्फी जावेदच्या जाण्यानं कुणाचेही नुकसान नाही',एका पोस्टने उडवला गोंधळ

उर्फीनं निधनाच्या अफवेच्या पोस्टचा स्क्रीनशॉट अभिनेत्रीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

अभिनेत्री उर्फी जावेद( Urfi javed) दर दिवशी आपले एकापेक्षा एक बोल्ड अंदाजातले फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर(Social Media) शेअर करीत असते. तिची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा रंगते मग भले ती विरोधातली का असेना. पण आता मात्र हद्दच झाली. उर्फीच्या निधनाची खोटी बातमी अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाली अन् एकच गोंधळ माजला. त्यावेळी लगेचच उर्फीनं आपला जिवंत असल्याचा पुरावा देत काही फोटो शेअर केले आणि प्रतिक्रिया देत या सगळ्या अफवेच्या बातमीवर नाराजीही व्यक्त केली. उर्फीच्या काही फोटोंना फोटोशॉप करत मीम्स बनवले गेले आणि तिच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल केली गेली.(Urfi Javed Death Rumour,Post Viral)

उर्फी जावेदने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक स्क्रीन शॉट शेअर केला आहे. यामध्ये दोन फोटोंचा कोलाज केला गेला आहे. एकात उर्फीच्या गळ्यात रशी बांधलेली दिसत आहे,तर दुसऱ्या एका फोटोत तिची जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख लिहिली गेली आहे. हा फोटो कैलाश राज नावाच्या नेटकऱ्यानं फेसबूकवर पोस्ट करीत लिहिलं आहे की- 'RIP उर्फी जावेदच्या जाण्यानं कोणाचंही नुकसान झालेलं नाही'. तसंच,त्याने असं देखील लिहिलं आहे की,'माझं उर्फीच्या खुन्याला समर्थन आहे'.

Urfi Javed Instagram Post viral

उर्फी जावेदनं स्क्रीन शॉट शेअर करीत लिहिलं आहे की,''या जगात काय घडत आहे? मला जिवंत मारुन टाकण्याच्या खूप धमक्या मिळाल्या आहेत,आणि आता हे. माझ्या खुन्याला त्याचं समर्थन आहे असं देखील हा महाभाग लिहितो आहे,मूर्ख कुठला''.

उर्फीच्या गळ्यात रशी टाकली आहे तो फोटो एडिट केला गेला आहे. उर्फीनं एक ड्रेस घातला होता,ज्यात टॉपच मिसिंग होता. तिनं लोखंडाच्या साखळदांड्यानं आपल्या शरीराला झाकलं होतं. त्याचं वजन इतकं होतं की त्यामुळे तिच्या गळ्याभोवती लाल खूण दिसू लागली होती. तिनं स्वतः ते फोटो शेअर केले होते.

सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद नेहमीच अतरंगी अंदाजात दिसते. फोटो-व्हिडीओ शेअर करतानाच सोशल मीडियावर ती अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना देखील दिसते. काही दिवसांपूर्वीच तिनं उदयपुर हत्याकांडावर(Udaypur Murder) भाष्य केलं होतं. तिनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत पोस्ट करत लिहिलं होतं,''अल्लाह, धर्माच्या नावावर कधीच अशा गोष्टी करायला मंजूरी देत नाही''. आता या पोस्टनंतर तिला खूप अर्वाच्य भाषेतील कमेंट्सचा सामना करावा लागला होता. धमकीचे मेसेजेसही तिला आले होते. इतकंच नाही तर तिनं आत्महत्या केल्याच्या अफवेला देखील पीक आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT