Urfi Javed News Esakal
मनोरंजन

Urfi Javed on Vivek Agnihotri: अरे तुला जास्तच फॅशन समजते का? उर्फीनं घेतला थेट विवेक अग्नीहोत्रीसोबत पंगा

Vaishali Patil

Urfi Javed on Vivek Agnihotri : 'द काश्मीर फाइल्स' सारखा सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काही वेगळा परिचय देण्याची गरज नाही. त्यांचे नाव नेहमीच चर्चेचा विषय असते. ते नेहमी त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. ते कुण्या कलाकाराला टोमणे मारण्याचा किंवा त्याच्यावर टिका करण्याची एकही संघी सोडत नाही.

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरु आहे. यात अनेक भारतीय अभिनेत्री त्याच्या फॅशनचा जलवा दाखवत आहे. याचवेळी विवेक अग्निहोत्री यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनला तिचा ड्रेस नीट करण्यास मदत करणाऱ्या 'पोशाख गुलाम' म्हणजेच 'कॉस्टयूम स्लेव्स'वर ट्विट करत टीका केली. त्याच हे ट्विट काही तासातच व्हायरल झालं आणि नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरवातही केली.

जिथे फॅशनचा विषय असतो तिथे उर्फी जावेद हिच नाव तर येतच. कारण तिनं तिच्या अतरंगी फॅशनमुळे फॅशन जगतात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

त्यामुळे तिने लगेच विवेक अग्निहोत्रीवर ऐश्वर्या राय बच्चनच्या फॅशन सेन्सबद्दल आणि त्या 'कॉस्टयूम स्लेव्स'वरील ट्विटवर चांगलिच भडकली आणि तिनं ट्विट करत यावर प्रतिक्रियाही केली. उर्फी जावेदने चित्रपट निर्मात्याच्या टिप्पणीवर खोचकपणे टीका केली आणि सोशल मीडियावर त्याची निंदा केली.

उर्फी जावेदने ट्विटर हँडलवर विवेक अग्निहोत्रीच्या 'Costume Slaves' या ट्विटला टिका करत ट्विट शेअर केले आहे. अभिनेत्री विवेक अग्निहोत्रीच्या ट्विटला रिट्विट करत लिहिले, 'मला हे माहित करुन घ्यायचं आहे की तुम्ही कोणत्या फॅशन स्कूलमधून पदवी घेतली आहे? तुला पाहून वाटतं असं वाटत की तुला फॅशनची खूप समज आहे, तू फॅशन चित्रपट दिग्दर्शित करायला हवा होता. '

आता उर्फीनं अग्नीहोत्री यांचं फॅशन संबधित ज्ञानावर प्रश्न निर्माण केले. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मात्र नेटकऱ्यांना यावेळी उर्फीचं बोलणं पटलं आहे. ते तिचं कौतुक करत आहेत. तिनं पहिल्यांदाच योग्य माणसाला योग्य उत्तर दिलं आहे. असं म्हणतं आहेत.

त्यात झालं असं की काही तासापुर्वी अग्नीहोत्री यांनी ऐश्वर्या रायचा फोटो शेअर करत लिहिले की, 'तुम्ही 'पोशाख गुलाम' (Costume Slaves) हा शब्द ऐकला आहे का? या बहुतेक मुली आहेत (यावेळी मात्र एक माणूस दिसतोय).

तुम्ही असे गुलाम आता भारतातील जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटींसोबत पाहू शकता. अशा अस्वस्थ फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि अत्याचारी बनत आहोत? आता याच वक्तव्यावर उर्फीनं टिका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT