Irfan Pathan Wife Safa : इरफान पठाण आणि त्याची पत्नी सफा यांचा सहकुटूंबाचा फोटो सोशल मीडियावर झाला आहे. ते दोघेजण सानिया मिर्झाच्या रिटायरमेंट पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी जेव्हा सफाचे फोटो पाहिले तेव्हा त्यांनी उर्फीला टोकले आहे. पार्टीमध्ये जाताना त्यांचा ड्रेस कोड हा चर्चेचा आणि कौतूकाचा विषय झाल्याचे दिसून आले आहे.
नेटकऱ्यांनी उर्फीला सफा आणि इरफानच्या त्या फोटोंवरुन काही गोष्टी गांभीर्यानं शिकण्याचा सल्ला दिला आहे. उर्फीच्या सौंदर्याच्या ज्या काही कल्पना आहेत त्यावर देखील नेटकऱ्यांनी यावेळी टीका केली आहे. त्यांनी इरफान आणि सफाचे कौतूक केले आहे. उर्फी तुला सफाकडून खूप काही शिकता येईल. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
न्युडिटी म्हणजेज सगळं काही....असं उर्फी समजते...
एका युझर्सनं लिहिलं आहे की, उर्फीच्या डोक्यात सुंदरतेच्या व्याख्या जरा वेगळ्या आहेत. उर्फीला असे वाटते की न्युडिटी म्हणजे सर्व काही, पण तसे नाही. आता सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल झाला आहे त्यावरुन आपल्याला कळून येते की, साधेपणा कशाला म्हणतात, इरफानची पत्नी सफा त्या पोशाखामध्ये किती सुंदर दिसते आहे, मात्र सोशल मीडियावर तऱ्हेवाईक फॅशन केली म्हणजे आपण किती चांगले हे दाखवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. असे त्या युझर्सनं लिहिलं आहे.
उर्फीला तिच्या अशा प्रकारच्या पोस्ट आणि कपड्यांमुळे तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. त्यावरुन तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या आहेत. मात्र उर्फी ही तिच्या वक्तव्यावर आणि निर्णयावर ठाम असल्याचे प्रत्येकवेळी दिसून आले आहे. सध्या सोशल मीडियावर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आणि त्याची पत्नी सफा यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी उर्फीची शाळा घेतली आहे.
इरफान पठाणची पत्नी सफा ही सौदी अरब या देशातील प्रसिद्ध मॉडेल म्हणून अनेकांना परिचित आहे. सफा आणि इरफाननं २०१६ मध्ये लग्न केलं. त्यांना आता दोन मुलं आहे. सफाचा तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. यावेळी नेटकऱ्यांनी सफा आणि उर्फीची तुलना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.