सोशल मीडियाची तडक-भडक पर्सनॅलिटी म्हणून प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद(Urfi javed) मरणाच्या दारातनं परतं आलीय हे माहितीय का तुम्हाला? एकदा उर्फी वीजेच्या तारांमध्ये फसली होती. आणि त्यातनं तिच्या आईनंच तिला वाचवल्याचं उर्फीनं सांगितलं आहे. उर्फीनं सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत ही भयानक आठवण शेअर केली आहे. उर्फी काहीतरी काम करीत होती,तिनं पायात चप्पल घातली नव्हती.अशातच एका वीजेच्या तारेच्या संपर्कात आली जी उघड्यावर पडली होती. हा अपघात इतका भयानक होता की उर्फी जावेदच्या हाताला जबरदस्त जखम झाली होती. तिनं हाताचा तो फोटो पोस्ट करत त्या अपघाताविषयी सांगितले आहे.
अतंरगी कपडे घालून अंगप्रदर्शन करणारी उर्फी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही पोस्ट करीत असते. काही दिवसांपूर्वी ती 'never have i ever' हा गेम खेळत होती. हा एक इन्स्टाग्राम फिल्टर आहे. ज्यामध्ये उर्फीला विचारलं गेलं होतं की, 'तिच्या जीवनात तिनं कधी मृत्यूचा सामना केला होता का?' याविषयी स्पष्टिकण देताना उर्फी जावेदनं आपल्या हाताचा पंजा दाखवला,ज्यावर हलकासा पिवळ्या रंगाची एक खूण दिसली. आणि मग तिनं मरण कसं आपल्या दाराशी आलं होतं हे सांगितलं.
कसा घडला होता अपघात
उर्फी जावेदने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''खूप धमाल किस्सा आहे,मी एकदा चक्क एक वीजेची तार हातात पकडली होती. त्यानंतर माझी शुद्ध हरपली होती. त्या शॉकचा माझ्यावर खूप वाइट परिणाम झाला होता. आजदेखील ती जखम माझ्या हातावर कायम आहे. माझी आई तिथे वेळीच पोहोचली म्हणून मी वाचले अन्यथा मी मेले असते,पण मी आईमुळे जिवंत आहे''.
उर्फी नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. आपल्या सोशल मीडियावरील अपडेट्सच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्टेड असते. उर्फीच्या अतरंगी फॅशनमुळे खरंतर ती अधिक चर्चेत असते. अलिकडेच तीनं स्वतःच्या फोटोपासून बनवलेला ड्रेस घातला होता,ज्यामुळे तिला ट्रोल देखील केलं गेलं होतं. तर सीक्युरिटी गार्डला शिस्तीत बोलायचा इशारा देणाऱ्या उर्फीच्या व्हिडीओलाही चाहत्यांनी जोरदार व्हायरल केलं होतं. फोटोग्राफर्सला एका इमारतीच्या इथं उभं राहून अतरंगी कपड्यात उर्फी पोझ देत होती तेव्हा सिक्युरिटी गार्डन हटकलं अन् उर्फीचा पारा चढलेला त्या व्हायरल व्हिडीओत सगळ्यांनी पाहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.