Urmila Kanitkar kothare: मराठी मनोरंजन विश्वातील एक देखणी आणि कसदार अभिनय करणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे. गेली अनेक वर्षे ती मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. अभिनेत्री म्हणून ती चर्चेत आहेच पण ती कोठारे घराची म्हणजे महेश कोठारे यांची सून आहे.
गेली काही दिवस तिच्या कामपेक्षा तुझ्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा अधिक आहे. पण पुन्हा एकदा उर्मिला आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकायला तयार आहे. एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत उर्मिला पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे आणि उर्मिलाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
(Urmila kanetkar kothare grand entry as manjula satarkar in Tuzech Mi Geet Gaat Aahe marathi serial on star pravah )
स्टार प्रवाहवरील ''तुझेच मी गीत गात आहे'' या मालिकेत उर्मिला पुन्हा एंट्री करणार आहे. या मालिकेत स्वराज आणि मल्हारचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मल्हारच आपले वडील आहेत ही गोष्ट स्वराजला कळली आहे.
इतकी वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या स्वराज म्हणजेच स्वराच्या आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मल्हारला ही गोष्ट स्वराज सांगू इच्छित असला तरी नियतीच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी आहे.
मल्हारला बाबा अशी हाक मारण्याचा क्षण आयुष्यात येण्यापूर्वीच स्वराजने अपघातात त्याचा आवाज गमावलाय. स्वराज त्याच्या मनातली भावना कशी व्यक्त करणार हे मालिकेतील पुढील भागांमधून उलगडेल. स्वराज आणि मल्हारच्या नात्यात हे भावनिक चढउतार सुरु असतानाच मालिकेत उर्मिला कानेटकरची एण्ट्री होणार आहे.
उर्मिलाने मालिकेत स्वराच्या आईचं म्हणजेच वैदेही हे पात्र साकारलं होतं. मालिकेत वैदेहीचं गंभीर आजारामुळे निधन दाखवण्यात आलं असलं तरी स्वराच्या आठवणींमधून उर्मिलाचं दर्शन प्रेक्षकांना होत राहिलं. आता उर्मिला या मालिकेत एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मंजुळा सातारकर असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तिच्या येण्याने मालिकेत नवं वळण येणार आहे. याआधी उर्मिलाला आपण ग्लॅमरस रुपात पडद्यावर पाहिलं आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतला अंदाज आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आणि हटके आहे.
या नव्या भूमिकेविषयी सांगताना उर्मिला म्हणाली, ‘तुझेच मी गीत गात आहेच्या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होताना अतिशय आनंद होत आहे. या मालिकेत मी वैदेही ही व्यक्तिरेखा साकारली होती. वैदेही या पात्राच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेचा लहेजा शिकायला मिळाला. आता मंजुळा सातारकर ही नवी व्यक्तिरेखा साकारणार आहे जी साताऱ्याकडची आहे. या भाषेचाही वेगळा गोडवा आहे. याआधी अश्या पद्धतीचं पात्र मी साकारलेलं नाही. या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भाषांचा लहेजा मला आत्मसात करता येतोय. मंजुळा हे पात्र वैदेही सारखं दिसणारं आहे. तिच्या येण्याने स्वराज आणि मल्हारच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.