Urvashi Rautela Phone Lost esakal
मनोरंजन

Ind Vs Pak Match: भारत मॅच जिंकला पण उर्वशी लागली रडायला, थेट पोलिसांकडेच..., काय होतं कारण?

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रेटी उर्वशी रौतेला ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Urvashi Rautela Phone Lost : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रेटी उर्वशी रौतेला ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचा आयफोन हे आहे. काल उर्वशी ही भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी अहमदाबाद येथे आली होती.

सोशल मीडियावर उर्वशीचा आयफोन हरवल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. उर्वशीनं देखील ट्विटवरुन ही बातमी सोशल केली आहे. त्यामुळे तिच्या या तक्रारीची दखलही घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खरंतर यापूर्वी याच स्टेडियम अनेक मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा फोनही हरवला होता. आयपीएलच्या वेळेस १०० हून अधिक आयफोन चोरीला गेले होते.

Also Read - Millet Food : हडप्पा संस्कृतीतील लोकही खात होते 'हे' अन्न

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममधून उर्वशीचा आयफोन हरवल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. त्या पोस्टही व्हायरल झाल्या आहेत. यावर अहमदाबाद पोलिसांनी त्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. उर्वशीनं भारत पाकिस्तान सामन्याच्या वेळेस काही व्हिडिओ शुट करुन ते पोस्ट केले होते. त्यानंतर तिचा मोबाईल अचानक गेल्याचे सांगण्यात आले आहे.

उर्वशीचं क्रिकेटप्रेम हे सर्वांना माहिती आहे. तिनं यापूर्वी देखील वेगवेगळ्या क्रिकेट सामन्यांना उपस्थिती लावून चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. यापूर्वी तिनं वर्ल्ड कप सामन्यांची पाच तिकीटं आपल्याकडे असल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते. तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावर आलेल्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील भन्नाट होत्या.

आता तिनं नरेंद्र मोदी स्टेडियमवर केलेलं फोटोशुट हे चर्चेत आलं आहे. त्यावरुन तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे तर काहींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता तिचा आयफोन हरवल्यानं तिनं अहमदाबाद पोलिसांकडे धाव घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT