Urvashi Rautela:उर्वशी रौतेला सध्या सिनेमांपेक्षा सोशल मीडिया वरील पोस्टमुळे भलतीच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिचे फोटो शेअर करीत आहे आणि कॅप्शनमध्ये असं सनसनाटी काहीतरी लिहिते की त्याची चर्चा होऊ लागते. तिच्या सगळ्याच पोस्टना ऋषभ पंतसोबत त्यानंतर जोडलं जातं. यादरम्यान उर्वशीनं आता एक नवीन पोस्ट शेअर केली आहे, तिनं नवीन पोस्टमध्ये इराणच्या महसा अमीनी सोबत स्वतःची तुलना केली आणि तिथेच चुकली. आता नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.(Urvashi Rautela Compare Her with mahsa amini say first in iran and now in india,it is happening with me)
इराणच्या महसा अमिनीविषयी थोडक्यात इथं सांगतो, ते म्हणजे २२ वर्षीय महसा अमिनीला पोलिसांनी हिजाब नीट परिधान केला नाही म्हणून कैद केलं होतं. तीन दिवसानंतर पोलिसांच्या ताब्यात असतानाच महसा अमिनीचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर इराणमध्ये अनेक ठिकाणी त्या विरोधात महिलांनी आंदोलन पुकारलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन जगभरात पोहोचलं. कितीतरी बॉलीवूड-हॉलीवूड सेलिब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
आता उर्वशीनं देखील या आंदोलनाचा उल्लेख करत नवी पोस्ट केली आहे. उर्वशी रौतेलानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''पहिलं ईराण मध्ये महसा अमिनी आणि आता भारतात मी...माझ्यासोबतही ते असंच करत आहेत,मला एखाद्या स्टॉकरसारखं धमकावलं जात आहे. कोणालाच माझी पर्वा नाही ना कोणी माझं समर्थन करत आहे. एखादी स्त्री जसं खळखळून हसते तशीच ती आक्रोश करुन रडतेही. स्त्री जशी शक्तीशाली आहे तशीच ती नाजूकही आहे. ती अध्यात्मिक आहेच तितकीच ती खूप प्रॅक्टिकल आहे. स्त्री खरं तर जगाला लाभलेलं एक मोठं वरदान आहे..''. .
महसा अमिनीसोबत स्वतःची तुलना करणं उर्वशीला मात्र भलतंच भारी पडलं आहे. तिला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनवायला सुरुवात केली आहे. लोकांचं म्हणणं आहे की ईराणमध्ये सुरु असलेलं हिजाबविरोधातलं आंदोलन हा एक मोठा मुद्दा आहे. त्या महिला खूप काही सहन करत आहेत.
उर्वशीने ईराणी महिला महसा अमिनी संदर्भातली पोस्ट शेअर करताना महसाला पोलिसांनी कैद केल्यापासून ते तिच्या मृत्यूपर्यंतचा सगळा उल्लेख त्या पोस्टमध्ये केला आहे आणि लिहिलं आहे की लोकांचा छळवाद आणि सक्तीवर पाबंदी आणायला हवी.
उर्वशी रौतेलानं त्या लोकांवर पलटवार केला आहे,जे म्हणत आहेत की उर्वशी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या मागे मागे ऑस्ट्रेलियापर्यंत गेली आहे. उर्वशीनं इन्स्टावर ऑस्ट्रेलियाचा मॅप शेअर करत लिहिलं आहे की,''हे भारतीय मीडियासाठी मी शेअर केलं आहे, त्यांनी पहावं ऑस्ट्रेलिया किती मोठं आहे''.
यानंतर उर्वशीने लोकांना स्टॉकरचा अर्थही समजावून सांगितला. तिनं हॅशटॅग यूज करत लिहिलं की,'' StopBullyingWomen''. तिनं असं देखील लिहिलं की,''मी जे लिहिलं आहे ते भारतीय मीडियासाठी आहे, जेणेकरुन त्यांना कळेल की स्टॉकरचा नेमका अर्थ काय आहे''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.