utkarsh shinde shared video about his experience in alibaug fish market  sakal
मनोरंजन

अलिबागच्या मच्छी मार्केटमध्ये चक्क कोळणीसोबत नाचला उत्कर्ष शिंदे..

यावेळी वयोवृद्ध कोळणीला नाचताना पाहून उत्कर्ष म्हणाला मलाही एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय..

नीलेश अडसूळ

utkarsh shinde : शिंदेशाहीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे उत्कर्ष शिंदे. ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे, शिंदेशाही गाण्याची ही परंपरा समर्थपणे पेलत आहे. बिग बॉस मराठीतून त्याची आणि आपली भेट झाली. त्याच्या दमदार खेळाने तो प्रेक्षकांच्या घरातच नाही तर मनात पोहोचला. उत्कर्ष डॉक्टरकी, गायन, लेखन, संगीत दिग्दर्शन अशा अनेक भूमिका पार पाडत आहे. नुकताच तो त्याच्या नव्या गाण्याच्या शुटींगसाठी अलिबागला गेला होता. यावेळी चित्रीकरणाच्या निमित्ताने उत्कर्ष अलिबागच्या मच्छी मार्केट मध्ये गेला. यावेळी त्याला एक म्हातारी कोळीण भेटली. तोच अनुभव त्याने एक पोस्ट शेयर करत सांगितला आहे.

(utkarsh shinde shared video about his experience in alibaug fish market)

अलिबागच्या मासळी बाजारात एक कोळीण आजी सुके मासे विकत होत्या. उत्कर्षला पाहून त्यांनी थेट गाणी म्हणायला सुरुवात केली आणि त्या नाचल्याही. त्यांचा उत्साह बघून उत्कर्षही भारावून गेला. उत्कर्ष म्हणतो, 'आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय.. आजच्या रिऍलिटी शो च्या युगात कैक कलाकारांना वाव मिळतो.ते टीव्ही वर हि दिसतात पण काही असे हि कलाकार आहेत ज्यांना परिस्तिथी मुळे स्वतःला सादरच नाही करता आल,त्यांच काय ?'

पुढे तो म्हणतो, 'अलिबाग वर आधारित एक गाणं करण्या साठी मी अलिबाग मध्ये शूट साठी गेलो असता .एका सिन साठी अलिबाग च्या मच्छी मार्केट ला जाण झालं .आणि तिकडेच मला भेटली एक मस्त मोला बाहुली सारखी नाचणारी गाणारी मासे विकणारी आजी.मला पाहताच जिने तू प्रल्हाद शिंदे -आनंद शिंदे च्या घरचो काय? असे विचारलं आणि अस विचारातच उत्साहाने गाणं सुरु केलं .आणि मग काय मी पण माझी शूटिंग थांबवून त्या आजी कडचा लोककलेचा खजिना ऐकत पाहत राहिलो त्या आजीने भरभरून तिचे कोळीगीत तर ऐकवलेच पण महान गायक विठ्ठल उमप व प्रल्हाद शिंदे ह्यांच्या त्या काळातिल अलिबाग मधला त्यांच्या गाण्याच्या कारेक्रमाच्या कैक आठवणी सांगितल्या.मला तर जसा खजिनाच सापडला.'

हातावर पोटअसणारा ,समुद्राला भिडणारा ,शहाळ्या सारखं मोठं प्रेमळ मन असणारा हा धाडसी कोळी समाज किती गोड,किती ऊर्जेने भरलेला आहे हि प्रचिती ह्या मासे विकणाऱ्या नाचत गात कोळी गीत गाणाऱ्या आजीला पाहून आली.आणि मनात विचार आला "आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय "

आजीला भेटून त्यांचे कोळीगीत ऐकून माझी तर ऊर्जा द्विगुणित झाली ,मी शूटिंग संपवली आणि मग सुखा म्हावरा ,कोळंबी ,सुखट, पापलेट ,सोलकडी वर ताव मारत.. काय ते मासे ..काय तो समुद्र ..काय तो कोळी समाज ..सगळं ok मधी हाय ..म्हणत अलिबागचा निरोप घेतला .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT