Aatmapamphlet Trailer Esakal
मनोरंजन

Aatmapamphlet Trailer: "लव्ह अ‍ॅट फर्स्ट हॅण्ड" आशिष बेंडे अन् सृष्टी दामलेच्या लव्ह स्टोरीचा त्रिकोण!

Vaishali Patil

Aatmapamphlet Trailer: हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी यासारख्या भन्नाट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक परेश मोकाशी हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. त्याच्या 'वाळवी' या मराठी सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

आता वाळवीच्या तुफान यशानंतर ते पुन्हा एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहे. त्याच्या या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होतीच.

त्या चित्रपटाचं नावं म्हणजे 'आत्मपॅम्फ्लेट'. ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या 'आत्मपॅम्फ्लेट' या चित्रपटाची निवड झाली. या चित्रपटाचा टिझर पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलिज केला आहे.

'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून ट्रेलर पाहिल्यानंतर नक्कीच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सांगितल्याप्रमाणे एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचं आत्मचरित्र आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे.

ट्रेलरची सुरुवात आशिष बेंडे आणि सृष्टी दामले यांच्या जोडीने होते. आशिषला पहिल्या नजरेत सृष्टी आवडते. त्यानंतर सृष्टीचं प्रेम मिळवण्यासाठी आशिष काय काय करामती करतो आणि त्याच्या प्रेमात तिसऱ्याची एंट्री कशी होते आणि पुढे आशिषला प्रेम मिळवण्यासाठी काय काय अडचणी येतात असे अनेक प्रश्न हा ट्रेलर पाहिल्यानंतर पडतात. त्याचबरोबर हलक्या फुलक्या स्टोरीसोबत हा चित्रपट नक्कीच काहीतरी संदेश देऊन जाणार असंही दिसतयं.

बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात आत्मपॅम्फ्लेटचा वर्ल्ड प्रीमियर झाला. तसेच नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स ऑस्ट्रेलियामधे सत्तर देशांमधल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला.

'आत्मपॅम्फ्लेट'बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, "आत्मचरित्र थोरामोठ्यांचीच असतात असा सर्वसाधारण नियम आहे, पण अत्यंत सामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असूच शकतं. तेच दाखवण्याचा प्रयत्न 'आत्मपॅम्फ्लेट' मधून करण्यात आला आहे."

या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या चित्रपटाचे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज 'आत्मपॅम्फ्लेट'चे निर्माते आहेत. हा चित्रपट ६ ऑक्टोबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT