vaibhav mangale shares post about drama theatre bad condition in maharashtra and says ac not working sakal
मनोरंजन

Vaibhav Mangale: एसी बंद, प्रचंड उकाडा त्यात डास.. दाद मागायची कुठे? नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर मांगले भडकले

अभिनेता वैभव मांगले यांची सणसणीत पोस्ट..

नीलेश अडसूळ

vaibhav mangle: अभिनेते वैभव मांगले म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव. मालिका नसो, नाटक किंवा चित्रपट त्यात वैभव मांगले असणार म्हणजे भूमिका चोख वाजणारच. म्हणूनच यांनी साकारलेला 'टाइमपास' मधील शाकाल अजूनही आपण विसरू शकलेलो नाही.

वैभव मांगले अजून एका गोष्टीसाठी ओळखले जातात ते म्हणजे, त्यांचा स्पष्टवक्तेपणा.. त्यांना जी बाब खटकते त्याविषयी टए अत्यंत परखडपणे भाष्य करतात. आजही त्यांनी एका अशाच मुद्दाला हात घातला आहे.

महाराष्ट्रातील नाट्यगृहांची अवस्था बिकट असणाऱ्यावरून अनेक कलाकारांनी आजवर आवाज उठवला आहे. पण त्यात अद्याप कधीच सुधारणा झालेली नाही. असाच एक प्रसंग अभिनेते वैभव मांगले यांच्यासोबत घडला आहे. या प्रकाराबाबत त्यांनी पोस्ट शेयर करत अत्यंत कडक शब्दात समाचार घेतला आहे.

(vaibhav mangale shares post about drama theatre bad condition in maharashtra and says ac not working)

वैभव मांगले म्हणतात, ''पुणे , औरंगाबाद , नाशिक येथे प्रयोग झाले संज्या छायाचे . एका हि ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती . रंग मंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला.''

''प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात( विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा , कोथरूड यशवंतराव .. उकाडा ) ) प्रयोग पहात होते . एक मर्यादे नंतर नाशिक मध्ये रसिकांचा राग ,हतबलता अनावर झाली त्यांनी गोंधळ केला . तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले .''

''पण आपण show must go ȏṅ वाले लोक . आम्ही विनंती केली की आम्हाला ही त्रास होतोच आहे .. इथे येई पर्यंत माहित नव्हतं कि एसी नाहीये . आमच्या निर्माते दिलीप जाधव यांनी 17 आणि 27 चे शो रद्द केले.''

पुढे ते म्हणाले, ''त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला . कालिदास ला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता . या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय . कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी ??? ''

''विचारलं तर सांगतात ac चालू आहे पण खूप गर्मी असल्याने एसी यंत्रणा नीट काम करत नाही . पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही . काय बोलावं या सगळ्यावर वर .????????'' अशी पोस्ट वैभव मांगले यांनी शेयर केली आहे. त्यांच्या पोस्टनंतर आता राज्यभरातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: तेल्हाऱ्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई, रोख रक्कम आणि दोन मोबाईल जप्त

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Sindhudurg Assembly Election 2024 : मतदानासाठी ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक

अर्ध्यावरती डाव मोडला! २९ वर्षांनी एन आर रहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, निवेदन जाहीर करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT