Vaibhavi Upadhyaya Death Esakal
मनोरंजन

Vaibhavi Upadhyaya Death:वैभवीच्या मृत्यूबाबत प्रियकराचा मोठा खुलासा..'आम्ही दोघंही'

Vaishali Patil

Vaibhavi Upadhyaya Death: टीव्ही मनोरंजन विश्वाला गेल्या काही दिवसांपासून मोठे धक्के बसले साराभाई वर्सेस साराभाई मध्ये जॅस्मिनची भूमिका करणाऱ्या वैभवी उपाध्यायच्या जाण्यानं तिच्या कुटूंबाबरोबरच तिच्या चाहत्यांना खुप मोठा धक्का बसला.

वैभवी तिचा जय गांधी प्रियकरासोबत त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीला जात होती. त्याचवेळी बंजारजवळील सिधवा येथे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं वाहन 50 फूट खोल दरीत कोसळली आणि वैभवीवर काळानं घाला घातला.

या अपघातात वैभवीचा जीव गेला मात्र जय वाचला पण तो गंभीर जखमी झाला. वैभवीच्या मृत्यूने जयला खुप मोठा धक्का बसला असून तो अजूनही यातुन बाहेर आलेला नाही.

मात्र वैभवीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यामध्ये तिने सीट बेल्ट घातला नसल्याचा दावा करण्यात आला होता. यावर तिचा प्रियकर जयने आता प्रतिक्रिया दिली असून त्याने अपघाताचा पुर्ण घटनाक्रम सांगितला आहे. आता जयने अपघातादरम्यान सीट बेल्ट लावल्याबद्दल खुलासा केला आहे.

'ईटाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत जय म्हणाला ' जर तुम्ही रोड ट्रिपमध्ये वेगाने असाल तर गाडी वेगाने चालवत असाल असा लोकांचा समज आहे. मात्र घटनेच्या वेळी असं काहीही नव्हत. आमची गाडी थांबली होती आणि आम्ही ट्रक निघून जाण्याची वाट पाहत होतो.

ट्रकने एक वळण घेतलं, परंतु ट्रकने मागील बाजूने कारला धडक दिली त्यानंतर कार घसरली आणि दरीत पडली. धडकल्याने वैभवी कारमधून खाली पडली. स्थानिक लोकांनी वैभवीला रुग्णालयात नेले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

'मी सध्या जास्त बोलण्याच्या स्थितीत नाही. पण मला एवढंच स्पष्ट करायचं आहे की आम्ही सीट बेल्ट लावला नव्हता आणि आमच्या गाडीचा वेग जास्त होता अशा अफवा लोकांनी पसरवू नये.'

त्यावेळी वैभवीचा भाऊ अंकितनेही सांगितले की, 'अपघाताच्या वेळी वैभवीने सीट बेल्ट लावला होता. रस्त्याच्या नियमांबाबत ती नेहमी सजग रहायची आणि कधीही सीट बेल्ट न लावता कारमध्ये बसली नाही. तिच्या गळ्यात सीट बेल्टच्या खुणा होत्या याची डॉक्टरांनीही पुष्टी केली.'

साराभाई व्हर्सेस साराभाई या सुपरहिट कॉमेडी शोमधून प्रेक्षक वैभवी उपाध्यायला ओळखतात. या शोमध्ये 'जस्मिन'ची भूमिका साकारून वैभवी खूप लोकप्रिय झाली. ती टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध सेलिब्रिटी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT