Vaishali Takkar suicide  esakal
मनोरंजन

Vaishali Takkar suicide : वैशालीचा आरोपी राहुल नवलानीविषयी धक्कादायक माहिती उघड...

मॉडेल प्रिया सोनी हिने केला खुलासा...

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिच्या आत्महत्येने तिच्या चाहत्यांसह  टिव्ही इंडस्ट्रीतील लोकांनाही मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येनंतर तिने लिहिलेल्या सुसाइड नोटमधुन अनेक खुलासे झाले. वैशालीला तिचा माजी प्रियकर राहुल नवलानी गेल्या अडीच वर्षांपासून त्रास देत होता. तो तिचा छळ करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

वैशालीच्या आत्महत्येनंतर राहुल कुटुंबासह फरार झाला होता आणि 19 ऑक्टोबर रोजी त्याला पोलिसांनी पकडले होते.राहुलला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी चार दिवसाच्या पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. आता पोलिस त्याची चौकशी करत असून आता त्याच्याबाबत अनेक माहित समोर येत आहे.

त्यातच  समोर आलेल्या माहिती नुसार राहुल नवलानी  याने वैशाली  सारखंच आणखी दोन महिलांना त्रास दिल्याचं कळतंय. या बाबत धक्कादायक खुलासा मॉडेल प्रिया सोनी हिनं केला आहे. प्रियाने दिलेल्या माहितीनुसार उद्योजक राहुल नवलानी याने तीन ते चार वर्षांपूर्वी आणखी दोन महिलांना वैशालीसारखंच छळलं होतं.

प्रियाने वैशालीबरोबर काम केलं होतं. तिनं सांगितल्याप्रमाणे राहुल फेसबुक, इस्टांग्रामसह सोशल मीडियावर महिलांना फॉलो करायचा.तो फिटनेस फ्रीक असल्याचे सगळ्यांना सांगायचा आणि महिलांना इंप्रेस करण्याचा प्रयत्न करायचा. त्यांनी तो विवाहित असल्याचंही सर्वांनकडून लपवलं होतं.प्रियाच्या म्हणण्यानुसार राहुलच्याविरोधात याआधिही राहुल विरोधात पोलिसांत तक्रार दाखलं करण्यात आली होती. 2017मध्ये मुंबईतील ओशिवरा इथल्या पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. दुसरी तक्रार नवी दिल्लीत नोंदवण्यात आली होती. परंतु त्यांच्यी दखल घेतली नाही. त्यामुळे तो वाचला.

हे तर एकच प्रकरण समोर आले आहे. राहुलबद्दल अनेक मोठे खुलासे उघड होणार आहे.राहुलला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी वैशालीची इच्छा पुर्ण व्हावी यासाठी वैशालीचे कुटूंब प्रयत्न करत आहे.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 27 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT