बेळगाव : प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुझं माझं सेम असतं. असे म्हणत..अनेक जण व्हॅलेंटाईनच्या दिवशीच आपल्या प्रेमाची कबुली देतात. काही जण प्रेम स्विकारतात तर काही नाकारतात. हा व्हॅलेटाईन डे सोमवारी (ता. १४) म्हणजेच आज साजरा केला जात आहे. मात्र, महाविद्यालये बंद असल्याने युवक व युवतींचाही हिरमोड झाला आहे. यामुळे यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ कसा साजरा करावा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. (Vallentine Day And Corona)
व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारात गेल्या पंधरा दिवसांपासून भेट वस्तु दाखल झाल्या असून त्या खरेदी करताना दिसतात. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी काही संघटना विरोध करताना दिसतात. मात्र, आपल्या प्रियकर प्रियसीला प्रेमाची भेटवस्तु देत अनेक जण हा डे साजरा करतात. टेडीबिअर, चॉकलेट, कॅण्डल असे साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. टेडीबीअर २०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत, चॉकलेट १० ते २५० रुपये, फुगे १० त १०० रुपये, कँण्डल ५ ते १०० रुपये, शोभेचे फुले, शुभेच्छा पत्रे ५० ते २५० रुपये, स्टँच्यु २५० ते १००० रुपये, किचेन २० ते २०० रुपये बाजारात उपलब्ध आहेत.
दरवर्षी व्हॅलेंटाईन डे हा महाविद्यालयात उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा हिजाब वादामुळे राज्यातील पदवीपूर्व व पदवी महाविद्यालये बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्सवावर विरझन पडले आहे. तरीही अनेकांनी हा डे साजरा करण्याचा बेत आखला आहे.
व्हॅलेंटाईन डे हा आमच्या संस्कृतीचा भाग नाही. प्रेम करायला एकच दिवस नाही. आयुष्यभर आपण प्रेम केलं पाहिजे. आपण फक्त प्रेयीवरच नाही तर आपल्या आई, वडील, भाऊ, बहिणींवरही प्रेम करतो.
-सिद्धार्थ चौगुले, विद्यार्थी
आपल्या घरचे किंवा मित्र, मैत्रिणींवर आपण प्रेम करतो. व्हॅलेंटाईन डे मुळे आपल्या संस्कृतीवर तसेच पुढील पिढीवर वाईट परीणाम होत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. पुढील पिढीला दिशा देण्याचे काम युवक व युवतींनीही केले पाहिजे.
-वैष्णवी मंगनाईक, विद्यार्थीनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.