मनोरंजन

Bwaal Trailer OUT: वरुण - जान्हवीच्या लव्हस्टोरीत हिटलरची एंट्री! मनाला आवडणारा पण डोक्यावरुन जाणारा 'बवाल'

Vaishali Patil

Bwaal Trailer: बॉलीवूड स्टार वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हे त्याच्या बावल या चित्रपटासाठी खुप चर्चेत आहे. या चित्रपटातुन ही जोडी पहिल्यांदाच स्क्रिन शेयर करणार आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला होता. आता त्यानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरवात वरुन धवनच्या दमदार एंट्रीने होते. तो लखनऊच्या अज्जू भैय्याची भूमिका साकारताना दिसत आहे. जो खऱ्या आयुष्यात तर लूजर आहे मात्र जगाला तो किती स्मार्ट आहे हे दाखवणाच्या प्रयत्नात असतो. तो एक इतिहास विषयाचा शिक्षक आहे ज्यांला युरोपच्या हिटलरबद्दल खूप रस आहे.

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्यातील प्रेमकहाणी सुरु होते. दोघांच्या प्रमकथेत ट्विस्ट येतो जेव्हा दोघे लग्नानंतर युरोपला पोहोचतात. ट्रेलरमध्ये जान्हवी आणि वरुणमधील रोमान्स, भांडण आणि ड्रामा दाखवण्यात आला आहे दुसऱ्या महायुद्धाशी जोडलेली आहे. जे स्वतःच खूप मनोरंजक आहे.

मात्र वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची लव्हस्टोरी जितकी रोमँटिक आहे तितकिच सस्पेन्सने भरलेली आहे. जी पुढे जाऊन खुप गोंधळेली दिसते. मात्र नंतरुन या प्रेम कहानीत हिटलर ची एंट्री होते आणि प्रेमाचा पिच काही क्षणातच युद्धाचं क्षेत्र बनत. तीन मिनिटाचं ट्रेलर तुमच्या मनाला तर आवडतो पण ही स्टोरी काय आहे हे तुम्हाला कळत नाही. हे रहस्य तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा बावल हा चित्रपट ओटीटीवर रिलिज होणार आहे. 21 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रवाहित होणार आहे. बावल चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी आहेत. जे सुपरस्टार आमिर खानच्या दंगल आणि सुशांतच्या छिछोरे या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे.

जान्हवी कपूर या चित्रपटाद्वारे चौथ्यांदा ओटीटीवर दिसणार आहे. यापुर्वी ती घोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेस - द कारगिल गर्ल आणि गुड लक जेरी या ओटीटी चित्रपटात दिसली होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात,इस्राईलचा इशारा; लेबनॉनच्या सीमेवर सैन्याची जुळवाजुळव

१२ चौकार, ३ षटकार! Sanju Samson चे खणखणीत शतक; श्रेयस अय्यरच्या संघाला सावरले

Latest Marathi News Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या नेतृत्वात महत्वाची बैठक

SCROLL FOR NEXT