गेली अनेक वर्ष वास्तु आणि ज्योतिर्विद्या यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी अनेकांना बहुमोल मार्गदर्शन केलं. त्यानंतर मनोरंजनाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देश्याने मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकत, ‘आलंय माझ्या राशीला’ हा यशस्वी चित्रपट दिला.
तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने कलाकार तंत्रज्ञाच्या उपस्थितीत आयोजित सक्सेस पार्टीत त्यांनी त्यांच्या ‘वास्तुशास्त्र' या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे.
(vastu astrology expert anand pimpalkar new marathi movie Vastushastra coming soon)
याप्रसंगी अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेता मंगेश देसाई, संदीप पाठक, अक्षय वाघमारे, नाटयनिर्माते दिलीप जाधव, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, प्रणव पिंपळकर, संग्राम चौघुले, दिग्दर्शक अजित शिरोळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘आलंय माझ्या राशीला’ या पहिल्या चित्रपटातून राशींच्या गमतीजमती मांडल्यानंतर 'वास्तुशास्त्र' या आगामी चित्रपटातून गूढ रहस्याचा चित्तथरारक अनुभव ते देणार आहेत. ‘सत्य कधीही मिटत नाही…!’ अशी टॅगलाईन असलेल्या 'वास्तुशास्त्र' चित्रपटातून कोणतं? आणि कोणाविषयीच्या सत्याची उकल होणार ? याची रोमांचकारी पण तितकीच भयप्रद थरारक कथा पहायला मिळणार आहे.
सोबत या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या मोशन पोस्टरमध्ये भला मोठा वाडा, कोसळणारा पाऊस, उडणारे पक्षी, कालचक्राची प्रतिकृती आणि भीतीदायक पार्श्वसंगीत ऐकू येत आहे. या मोशन पोस्टरने प्रत्येकाची उत्सुकता वाढवली असून फेब्रुवारी २०२४ ला ‘वास्तुशास्त्र' मागचं गूढ उलगडणार आहे. आनंदी वास्तु आणि साईकमल प्रोडक्शन या चित्रपटाची प्रस्तुती करीत आहेत.
चांगलं मनोरंजनात्मक काही दिलं तर प्रेक्षक त्याला नक्की प्रतिसाद देतात. ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाच्या यशाने ते अधोरेखित झालं आहे. 'वास्तुशास्त्र' चित्रपट प्रेक्षकांचं नक्की मनोरंजन करेल असा विश्वास आनंद पिंपळकर यांनी व्यक्त केला.'वास्तुशास्त्र' चित्रपटाविषयीची अधिक माहिती लवकरच आपल्यासमोर येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.