स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आगामी हिंदी वेबसिरीज भेटीला येणार आहे. मराठमोळे अभिनेते आणि URI सिनेमातून बॉलिवूड गाजवणारे अभिनेते योगेश सोमण या वेबसिरीजच्या लेखन - दिग्दर्शनाची धूरा सांभाळणार आहेत.
वीर सावरकर सिक्रेट फाइल्स असं या वेबसिरीजचं नाव असून भोर येथील राजवाड्यात या वेबसिरीजच्या शूटींगला सुरुवात झालीय. या वेबसिरीजबद्दल लेखक - दिग्दर्शक योगेश सोमण यांनी भावना व्यक्त केल्यात.
(veer savarkar hindi web series yogesh soman express his feelings about veer savarkar)
दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे असे आम्हाला वाटते.
योगेश पुढे म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हा आमचा उद्देश नसून 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसे मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे."
योगेश सोमण पुढे सांगतात, "सावरकर यांचे जीवन हा जवळपास १०० वर्षांचा इतिहास आहे. यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे असा आमचा प्रयत्न असणार आहे.
शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कुणीही गुरु नव्हते. सावरकर जन्मतः नेते होते. एकलव्यासारखी त्यांची वाटचाल आहे. सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते अनफोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे."
पुढे बोलताना सोमण म्हणाले की, "आजपर्यंत सावरकर यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आले. परंतु वेब सीरिजच्या माध्यमात प्रथमच ही गोष्ट समोर येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर हिंदी भाषेतील चार सीझनमध्ये ही वेबसिरीज असणार आहे. पहिल्या सिझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे १८८३ ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड पाहता येणार आहे."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.