Special Article on Ramesh Deo esakal
मनोरंजन

..अन्‌ रमेश देव ठरले 'लंबी रेस का घोडा’

रमेश देव यांना रेस मधील ओ की ठो कळत नव्हते पण त्यांनी अंदाजाने एका घोड्यावर बोट ठेवले.

धनंजय कुलकर्णी

रमेश देव यांना रेस मधील ओ की ठो कळत नव्हते पण त्यांनी अंदाजाने एका घोड्यावर बोट ठेवले. (Special Article on Ramesh Deo)

ख रे तर दिनकर द. पाटील यांच्या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम राम पाव्हणं’या चित्रपटात (Movies) पहिल्यांदा अभिनेते रमेश देव (Ramesh Dev) पडद्यावर झळकणार होते, परंतु त्यांची ही भूमिका एडिटिंगमध्ये कापली गेली! परंतु श्रेय नामावलीत त्यांचे नाव कायम राहिले. याचाच अर्थ ते चित्रपटात दिसले नसले तरी श्रेय नामावलीतून पडद्यावर मात्र चमकले. यानंतर रमेश देव यांनी ‘शारदा’,‘छत्रपती शिवाजी’,’माय बहिणी’‘मुकं लेकरू’,’महाराणी येसूबाई’,‘कुलदैवत’ आदी चित्रपटांत भूमिका करत राहिले. पण जम बसत नव्हता.

अखेरीस चित्रपटात करिअर (Career) करता येत नाही, असं समजून त्यांनी पोलिसांत भरती व्हायचे ठरवले. मुलाखतीसाठी जाताना मोठे बंधू उमेश देव यांच्याकडून पैसे घेण्यासाठी ते पुण्याला गेले. उमेश देव यांना घोड्यांच्या शर्यतीचा (रेस) शौक होता. त्यामुळे त्यांना ते रेसकोर्सवरच भेटायला गेले. तिथे दिग्दर्शक राजा परांजपे देखील होते. तेसुद्धा रेसचे शौकीन! रमेश देव यांची बंधूंनी त्यांच्याशी ओळख करू दिली. राजा परांजपे यांना काय वाटले माहित नाही पण त्यांनी रेसच्या त्या दिवसाच्या कार्यक्रमाचा कागद रमेश देव यांच्या समोर धरला आणि ‘यातील कुठल्या घोड्यावर मी पैसे लावू?’असे विचारले.

रमेश देव यांना रेस मधील ओ की ठो कळत नव्हते पण त्यांनी अंदाजाने एका घोड्यावर बोट ठेवले. राजा परांजपे यांनी त्या घोड्यावर पैसे लावले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो घोडा शर्यत जिंकला! त्या काळात राजा परांजपे यांना तब्बल अठरा हजार रुपये मिळाले. १९५५ मध्ये ही फार मोठी रक्कम होती. त्यामुळे त्यांना रमेश देव खूप लकी वाटले. त्यांनी सहज त्याला विचारले, ‘‘तू सध्या काय करतोस?’’ त्यांनी सांगितले,‘‘ मी पोलीस भरतीला चाललो आहे आहे!’’ राजा परांजपे तत्काळ म्हणाले, ‘‘पोलिसभरती वगैरे सगळं विसर. माझ्या नव्या चित्रपटाचा तू खलनायक आहेस!’’ हा चित्रपट होता ‘आंधळा मागतो एक डोळा’!रमेश देव यांची ही पहिली मोठी भूमिका होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. पुढे राजा परांजपे आणि रमेश देव यांची जोडी जमली आणि अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट त्यांनी दिले. रमेश देव खऱ्या अर्थाने ‘लंबी रेस का घोडा’ ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT