veteran actor Vikram Gokhale last movie sur lagu de poster out released soon sakal
मनोरंजन

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट 'सूर लागू दे' लवकरच प्रदर्शित..

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले, त्यांची ही शेवटची कलाकृती आहे..

नीलेश अडसूळ

Vikram Gokhale: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्व शोकाकुल झालेले असतानाच एक दिलासा देणारी बातमी समोर आली. आपल्याला गोखले काकांना पडद्यावर पाहता येणार आहे. त्यांचा 'सूर लागू दे' हा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

(veteran actor Vikram Gokhale last movie sur lagu de poster out released soon)

कलाकार आपल्यातून गेला तरी त्याने केलेलं काम हे कायम अजरामर राहत असतं. त्यांच्या कलाकृतीतून ते आपल्याला भेटत असतात. विक्रम गोखले आज आपल्यात नसले तरी ते कलाकृतींमधून आपल्यासोबत राहणार आहेत. लवकरच त्यांचा शेवटचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सूर लागू दे' (Sur Lagu De) असे या चित्रपटाचे नाव असून नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

'सूर लागू दे' या चित्रपटाचे कथानक काहीसे वेगळ्या धाटणीचे आहे असून शीर्षकातच संगीताचा ताल दडलेला आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये हे दोन दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर सुप्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेत्री रीना अगरवालही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

निर्माते अभिषेक 'किंग' कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी या चित्रपटाच्या वितरणाचं काम पाहत आहेत.

विक्रम गोखले यांनी नेहमी संवेदनशील, सामाजिक आशयावर आधारलेले, वर्तमान काळाशी निगडित असलेलल्या आणि नाविन्यपूर्ण विषयावर आधारलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'सूर लागू दे' हा चित्रपट त्यांची परंपरा पुढे सुरू ठेवणारा असून त्यांच्या पश्चातही त्यांचं काम आणखी प्राभावीपणे सादर करणारा ठरेल. या चित्रपटाची कथा अशा लोकांवर आधारलेली आहे ज्यांच्यासाठी विक्रम गोखले कायम उभे राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT