Veteran actress Nilu Kohli's husband passes away dead body found in bathroom at home sakal
मनोरंजन

Nilu Kohli: अभिनेत्री निलू कोहली यांच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये सापडला मृतदेह..

निलू कोहली यांचे पती हरमिंदर सिंग यांच्या निधनाने बॉलीवुडवर पुन्हा मोठी शोककळा पसरली आहे.

नीलेश अडसूळ

Nilu Kohli's husband passes away : अनेक चित्रपट आणि मालिका गाजवणाऱ्या हिंदी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री निलू कोहली यांच्या पतीचं निधन झालं आहे.  हरमिंदर सिंग असे त्यांचे पतीचे नाव असून मुंबईतील राहत्या घरी बाथरूम मध्ये त्यांचा मृतदेह आढळला. या बातमीने बॉलीवुडवर मोठी शोककळा पसरली आहे.

(Veteran actress Nilu Kohli's husband passes away dead body found in bathroom at home)

आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री निलू कोहली यांचे पती हरमिंदर सिंग कोहली यांचे शुक्रवारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्यांची प्रकृती उत्तम होती परंतु शुक्रवारी दुपारी गुरुद्वारातून घरी परतल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले आणि तिथेच कोसळले.

त्यावेळी घरात निलू कोहली नव्हत्या. ही बाब घरातील नोकरच्या लक्षात येताच त्याने बाथरूम मध्ये धाव घेतली तेव्हा हरमिंदर बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु तिथे गेल्यावर डॉक्टरांनी हरमिंदर कोहली मृत झाल्याचे घोषित केले.


एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार 'शुक्रवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. ते सकाळी गुरुद्वारात गेले होते, आल्यावर ते फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले आणि तिथेच कोसळले. त्यांच्या घरी फक्त एक मदतनीस होता. तोही पण जेवणाची तयारी करत होता. पण बराच वेळ हरमिंदर यांचा आवाज येईना म्हणू ते झोपायला गेले असावे असे त्याला वाटले. पण, ते बेडरूममध्येही नव्हते. मग तो बाथरूम कडे गेला बाथरूमचा दरवाजा लॉक केला नव्हता. त्याने अंत डोकावले तर हरमिंदर बेशुद्ध होऊन पडले होते.' नीलू कोहली यांचा मुलगा परदेशी असल्याने हरमिंदर सिंग यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT