Veteran Marathi Actress Seema Deo Passed Away esakal
मनोरंजन

Actress Seema Deo : 'आलिया भोगासी ते या सुखांनो या'! सीमा देव यांच्या स्मृतींना उजाळा, साठ वर्षांपूर्वी कोल्हापुरात झाला विवाह

सीमा देव यांनी आज आयुष्याच्या स्क्रीनवरून कायमची एक्झिट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

रमेश देव व सीमा (नलिनी सराफ) या दोघांचीही रूपेरी कारकीर्द १९५७ च्या सुमारास सुरू झाली.

कोल्हापूर : लोकलच्या डब्यात झालेली पहिली भेट, एकाच वेळी ‘आलिया भोगासी’ या एकाच चित्रपटाचे कॉँट्रॅक्‍ट आणि त्यानंतर संसाराबरोबरच रुपेरी पडद्यावरही एकमेकांना दिलेली साथ...

अशा अभिनेत्री सीमा देव (Marathi actress Seema Deo) यांच्याविषयीच्या आठवणींना आज पुन्हा उजाळा मिळाला. सीमा देव यांनी आज आयुष्याच्या स्क्रीनवरून कायमची एक्झिट घेतली. साहजिकच त्यांच्याविषयीच्या आठवणी पुन्हा जाग्‍या झाल्या.

रविवार पेठेत वास्तव्य, राजाराम थिएटरमध्ये विवाह

रमेश देव व सीमा (नलिनी सराफ) या दोघांचीही रूपेरी कारकीर्द १९५७ च्या सुमारास सुरू झाली. ‘आलिया भोगासी’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची सीमा यांच्याशी पहिली भेट झाली आणि त्यानंतर सहा वर्षांनी एक जुलै १९६३ ला त्यांचा विवाह झाला, तो येथील राजाराम (सध्याचे अयोध्या) थिएटरमध्ये.

या सोहळ्याला सारी मराठी सिनेसृष्टी आणि कोल्हापूरकरांचीही मोठी गर्दी होती. या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही आज व्हायरल झाली. देव कुटुंबीय रविवार पेठेत राहायला होते आणि अंबासदन असे त्यांच्या घराचे नाव होते. सकाळी आठ वाजून २२ मिनिटांनी विवाहाचा मुहूर्त होता.

येथे २००८ साली झालेल्या ‘पुलोत्सवात’ देव दाम्पत्याची प्रकट मुलाखत रंगली होती. देव दाम्पत्याच्या सिने-रंगभूमीवरील पन्नास वर्षांच्या कारकिर्दीबद्दल सत्कारही झाला होता. या वेळी परस्परांना कोपरखळ्या देत आयुष्यभराच्या साथीबद्दल कृतार्थ भावना त्यांनी व्यक्त केली होती.

याच वर्षात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटाची निर्मिती रमेश देव प्रॉडक्शनतर्फे केली होती. या चित्रपटासाठी पाच लाखांचा निधी कोल्हापूर महापालिकेतर्फे या दाम्पत्याकडे देण्यात आला होता.

लोकसभा आणि नृत्याविष्कार

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १९९६ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून रमेश देव यांना अगदी कमी कालावधीत उमेदवारी जाहीर झाली. यानिमित्ताने त्यांनी सारा मतदारसंघ पिंजून काढला होता. या प्रचारात सीमा देव यांचाही सहभाग होता. २०११ साली येथे झालेल्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत या दाम्पत्याला जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

यानिमित्तानेही या दाम्पत्याने कोल्हापूरविषयीच्या आठवणींना उजाळा दिला होता. २०१७ साली येथील भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त ‘देव गाणी’ हा कार्यक्रम रंगला होता. ‘सूर तेची छेडिता...’, ‘सांग कधी कळणार...’ या गीतांवर या दाम्पत्याने दिलखुलासपणे नृत्याविष्कार केला होता. अंतरंग वाद्यवृंदाचे महेश हिरेमठ आणि सहकाऱ्यांनी ही मैफल खुलवली होती.

हो, पुन्हा लग्न करतोय... त्याच पोरीशी!

देव दाम्पत्याच्या विवाहाचा सुवर्णमहोत्सव एक जुलै २०१३ रोजी जुहू येथील इस्कॉन मंदिरात झाला होता. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा विवाह केला. या वेळी ‘सकाळ’ने अभिनेते रमेश देव यांची मुलाखत घेतली होती.

‘काय देवसाहेब, तुम्ही पुन्हा विवाहबंधनात अडकणार?’ या प्रश्‍नावर त्यांनी नेहमीच्या खुमासदार शैलीत ‘अरे, होय. पुन्हा लग्न करतोय; पण त्याच पोरीशी हां!’ असे दिलखुलास उत्तर दिले होते. आई, गुरू राजा परांजपे आणि पत्नी सीमा यांच्यामुळेच ‘रमेश देव’ अशी आपली वेगळी ओळख निर्माण झाली, असे रमेश देव आवर्जुन सांगायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सलील देशमुख पत्रकार परिषद घेणार

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT