Munawwar Rana, Munawwar Rana health update, Munawwar Rana poet, Munawwar Rana shayri SAKAL
मनोरंजन

Munawwar Rana: प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांची प्रकृती खालावली, पुढील 72 तास अत्यंत महत्वाचे

मुनव्वर राणा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Devendra Jadhav

Munawwar Rana in ICU: उर्दू साहित्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कवी मुनव्वर राणा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुनव्वर राणा यांना रुग्णालयाच्या ICU वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून पुढील ७२ तास मुनवर राणा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मुलगी सुमैया राणा हिने त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी, सर्वजण प्रार्थना करत आहेत.

मुनव्वर राणा यांची मुलगी सुमैया राणा हिने एका व्हिडिओद्वारे लोकांना वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

सुमैया म्हणते, "माझ्या वडिलांची प्रकृती बर्‍याच दिवसांपासून बिघडत होती. ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत आणि लोकांना ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती मी करते."

याशिवाय त्यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून वडिलांची तब्येत खराब आहे. सुमैयाने सांगितले की, वडिलांवर सध्या उपचार सुरू असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

तसेच पुढील ७२ तास म्हणजेच तीन दिवस मुनव्वर राणांसाठी खूप महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ज्येष्ठ कवी मुनव्वर राणा दीर्घकाळापासून अनेक आजारांशी झुंज देत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मुशायरांमध्ये सहभागी होणं थांबवलं आहे.

त्यांच्या शेवटच्या मुशायरात अनेकदा ते त्यांच्या तब्येतीबद्दल बोलताना ऐकायला मिळतात. अनेकदा त्यांच्या गुडघ्याच्या दुखापतीबद्दल बोलत असत.

आणि म्हणायचे की माझ्या गुडघ्याचे ऑपरेशन इतके वेळा झाले आहे की मी डॉक्टरांना सांगितले की त्यात साखळी घाला. आता मुनव्वर राणा आजारपणातुन ठणठणीत बरे व्हावेत, म्हणुन त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT