Veteran Telugu Actress Jamuna  Sakal
मनोरंजन

Jamuna Demise : ज्येष्ठ दक्षिणात्या अभिनेत्री जमुना यांचे निधन; सुनील दत्त यांच्यासोबतही केले होते काम

जमुना यांचा जन्म 30 ऑगस्ट 1936 रोजी कर्नाटकातील हम्पी येथे झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

Veteran Telugu Actress Jamuna Demise : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

दक्षिण भारतातील ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. जमुना यांचा जन्म 30 ऑगस्ट 1936 रोजी कर्नाटकातील हम्पी येथे झाला होता. जमुना यांचे खरे नाव जनाबाई असे होते. त्यांनी 1953 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी गरिकापरी राजा राव दिग्दर्शित 'पुट्टीलू' मधून अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली होती.

जमुना यांनी तेलुगू, तामिळ आणि 11 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. जमुना यांना सुनील दत्त आणि नूतन अभिनीत मिलन (1967) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.  

 
अभिनयासह राजकराणातही केला होता प्रवेश

जमुना यांनी अभिनय क्षेत्रासह राजकारणातही नशीब आजमावले होते. काँग्रेसला पाठिंबा देऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. 1980 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या प्रभावाने त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. 

त्यानंतर 1989 मध्ये त्या राजमुंद्रीमधून लोकसभेवर निवडून आल्या. मात्र, 1991 मध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारणाला रामराम केला. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत 1990 च्या उत्तरार्धात पक्षाचा प्रचार केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT