Yami Gautam, Vivek Agnihotri Google
मनोरंजन

यामी गौतमच्या मदतीला विवेक अग्निहोत्री गेले धावून; काय घडलंय नेमकं?

'द काश्मिर फाईल्स'वरनं वाद सुरु होते तेव्हा यामीनं सिनेमाला सपोर्ट केला होता,आता यामीवर संकट आलं तेव्हा विवेक अग्निहोत्रींनी सहकार्यांचा हात दिला.

प्रणाली मोरे

अभिषेक बच्चन,निमरत कौर आणि यामी गौतम (Yami Gautam) यांचा 'दसवी' सिनेमा ७ एप्रिल रोजी सिनेमागृहासोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला प्रदर्शानानंतर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. कोणी सिनेमाच्या कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे तर कुणी त्याच्या कमकुवत बाजू सांगितल्या आहेत. यात कोणाच्या अभिनयावर जास्त टीका-टिप्पणी झाली असेल तर ती आहे यामी गौतम. मीडिया रिव्ह्यूमधनं यामी गौतमच्या अभिनयाला नावं ठेवतानाच तिच्या पूर्ण करिअरवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. ज्यासंदर्भात स्वतः यामीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खुलासा केला आहे. त्यानंतर तिचं समर्थन करताना मदतीला धावून गेलेयत 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री.

सिनेमाच्या रिव्ह्यूमधील एका ओळीचा स्क्रीन शॉट यामीनं शेअर केला आहे. ज्यात लिहिलं आहे,''यामी गौतमला आता हिंदी सिनेमात गर्लफ्रेंडच्या भूमिका मिळणं बंद झालं आहे. सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्रीला आता त्याच त्याच भूमिका मिळू लागल्यात. आजून तिला बरंच स्ट्रगल करायचं आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी''. या स्क्रीनशॉटला शेअर करीत यामीनं ट्वीट केलं आहे की,''मी काही बोलू का,पण त्याआधी मला सांगायचंय की मी नेहमी माझ्यावर केली गेलेली टीका अभिमानानं स्विकारते. पण जेव्हा काही समिक्षक तुम्हाला सतत खाली खेचण्यासाठी नको ती टिप्पणी करतात तेव्हा बोलणं आवश्यक असतं''.

तिनं ट्वीटमध्ये लिहीलं आहे,''माझ्या नुकत्याच आलेल्या काही फिल्म्स आणि त्यातील परफॉर्मन्सेसमध्ये 'अ थर्सडे', 'बाला', 'उरी' अशांचा समावेश आहे. तरी माझ्या कामाची उपेक्षा केली जातेय. हे खेदजनक आहे. अपमानास्पद आहे. मेहनत घेऊन करिअर करण्यात कितीतरी वर्ष निघून जातात. खासकरुन ज्यांना स्वतःचं करिअर स्वतःच घडवायचं असतं तेव्हा. खूप झिजावं लागतं,कष्ट उपसावे लागतात यासाठी. सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यानंतरही हे काही डिजिटल पोर्टल्स असतात जे तुम्हाला खाली खेचायला,कमी लेखायला तत्पर असतात''.

यामीनं पुढे आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,''हे खूप दुःख देणारं आहे. मी पहिल्यांदा अशापद्धतीच्या टीकेला सामोरी जातेय. माझ्यासारखेच अनेकजण गेले असतील. पण पुन्हा असं करु नका. मी तुम्हाला विनंती करते की माझ्या परफॉर्मन्सवर समिक्षा करु नका.मला त्यात अधिक आनंद होईल आणि दुःखही कमी होईल''.

यामीच्या या पोस्टचं 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी समर्थन केलं आहे. यामीनं सोशल मीडियावर इतके स्पष्ट विचार मांडले याविषयी तिचं कौतूक केलं. त्यांनी पुढे थेट समिक्षक अनुपम चोप्रा यांना माफिया संबोधत त्यांच्या समिक्षेची तुझ्या अभिनयाला गरज नाही असं म्हटलं आहे. यामी गौतमनं देखील विवेक अग्निहोत्रींना 'द काश्मिर फाईल्स'वरनं उठलेल्या वादानंतर सपोर्ट केला होता. यामी गौतमचा नवरा दिग्दर्शक आदित्य धर हा एक काश्मिरी पंडित आहे. त्यामुळे यामीनं 'द काश्मिर फाईल्स'ला सपोर्ट केला तर नवल नव्हे अशी चर्चा त्यावेळी रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT