Sam Bahadur News: विकी कौशलची प्रमुख भुमिका असलेला सॅम बहादुर सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. टीझरमध्ये विकी कौशलचा जबरदस्त अभिनय सर्वांची मनं जिंकून गेलाय.
विकी कौशल सिनेमात भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भुमिका साकारत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलंय. सिनेमा रिअलिस्टीक आणि एकदम खराखुरा दिसावा म्हणुन मेघना गुलजार यांनी महत्वाचा निर्णय घेतला.
(vicky kaushal shooting with real army officer in sam bahadur directed by meghna gulzar)
खऱ्या जवानांसोबत चित्रीत झालाय सॅम बहादूर
१९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात विकी कौशल फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
अमर उजालाने दिलेल्या रिपोर्टनुसार, विक्की कौशलने सिनेमात ज्युनियर कलाकारांसोबत नाही तर संरक्षण दल आणि संरक्षण दलात काम करणाऱ्या जवानांसोबत चित्रपट शूट केला आहे.
सिनेमाच्या टीझरमध्ये दिसतं की विकीच्या भोवती अनेक भारतीय जवान आहेत. यातले जवान हे खरेखुरे इंडियन आर्मी ऑफीसर आहेत. मेघना गुलजार यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय.
मेघना गुलजार यांचा सॅम बहादूरसाठी महत्वाचा निर्णय
सॅम बहादुर चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत मेघना गुलजार यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय.
मेघना यांनी याआधी राझी, तलवार असे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. सिनेमा अधिकाधिक वास्तववादी दिसावा म्हणून मेघना कायमच आग्रही असतात.
सॅम बहादुरसाठी सुद्धा मेघना गुलजार यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. सॅम बहादुर सारख्या महत्वाच्या बायोपिकमध्ये त्यांना प्रामाणिक गोष्टी ठेवायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी सिनेमात बहुतांश रिअल लाईफ आर्मी ऑफीसर यांना घेतले आहे.
या तारखेला सॅम बहादुर येणार भेटीला
विकीचा सॅम बहादुर या चित्रपटाचा टीझर १३ ऑक्टोबरला मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाच्या टीझरला विकी कौशल, सान्या मल्होत्रा, फातिमा साना शेख, विकी कौशल आणि निर्माते आणि क्रु उपस्थित होते.
सॅम बहादुर चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये येणार आहे. त्याची टक्कर रणबीर कपूरच्या अॅनिमल सोबत असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.