Sidharth Shukla News, Bollywood news in Marathi, Vidyut Jammwal News Shukla  esakal
मनोरंजन

मित्र सिद्धार्थची आठवण येताच विद्युत जामवाल होतो भावूक, 'आईने खूप शिकवले'

बाॅलीवूड अभिनेता विद्युत जामवाल आपला मित्र सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाने खूपच दुःखी आहे.

सकाळ डिजिटल टीम

बाॅलीवूड अभिनेता विद्युत जामवाल आपला मित्र सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाने खूपच दुःखी आहे. विद्युत आणि सिद्धार्थ हे खूप जवळचे मित्र होते. दोघांनीही अनेक वर्ष एकत्र काम केले. एक नव्हे तर गेल्या पंधरा वर्षांपासून विद्युत आणि सिद्धार्थ मित्र होते. विद्युतने यापूर्वीच सांगितले होते, की कशा प्रकारे सिद्धार्थची आई त्याला जेवणासाठी बोलवत होती आणि आपल्या हाताने खाऊ घालत होती. सध्या विद्युत आपला चित्रपट खुदा हाफिज : चॅप्टर २ अग्निपरीक्षाच्या प्रमोशन करत आहे. या दरम्यान त्याने आपल्या खास मित्राची पुन्हा आठवण ताजी केली आहे. (Vidyut Jammwal Remembers Sidharth Shukla Says His Mother Inspired Him)

तसेच अभिनेत्याच्या आईविषयी काही गोष्टी सांगितल्या असून ती चाहत्यांना चकित करुन टाकेल. 'झी'शी विद्युतने संवाद साधला. तो म्हणाला, तुम्ही काही नुकसानीची भरपाई करु शकत नाही आणि त्या नेहमी आठवणीतच राहतात. विद्युत जामवालने (Vidyut Jammwal) सांगितले की नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक छायाचित्र पाहिले होते. त्यात तो आणि सिद्धार्थ शुक्लाची (Sidharth Shukla) माॅडेलिंगच्या दिवसातील क्षण चित्र झाले होते. विद्युतने सिद्धार्थच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याने त्याच्याविषयी मनमोकळेपणाने सांगितले. सिद्धार्थ हा त्याच्यासाठी जीवाभावाचा माणूस होता. (Bollywood news in Marathi)

आपला खास मित्र आणि सिद्धार्थच्या आईविषयी विद्युत म्हणाला, मी आई रिटाकडून खूप काही शिकलो आहे. त्या प्रसंगी ऊर्जास्त्रोत म्हणून आईने खूप काम केले होते. तो म्हणाला, ही बाब डोक्यातून कधीच जात नाही. वास्तविक हे छायाचित्र आज ट्विटरवर माझ्या एक जुन्या फॅशन शोमधून मिळाले आणि हे फक्त ( तुम्हाला परत आठवणीत घेऊन जाते). तुम्ही या प्रकारे बरे होऊ शकत नाही. मी त्याच्या आईकडून एक खूपच चांगली गोष्ट शिकलो, जे मी कधी पूर्वी ऐकले नव्हते. त्याच्या आईने माझे आयुष्य बदलून टाकले. मी नुकतेच आईला भेटलो आणि तिने मला काही सांगितले, असे विद्युत म्हणाला. सिद्धार्थच्या निधनानंतर आई कधीच रडली नव्हती आणि आता ती आश्रू ढाळताना दिसणार नाही. ती मला म्हणाली, विद्युत, सीन काय आहे ? इतके लोक त्याच्यासाठी रडत आहेत. मी नाही रडणार आता, माझा मुलगा स्वर्गात आहे आणि त्याला कळले पाहिजे की इतर सर्व रडत आहेत. मात्र त्याची आई मजबूत आहे. हेच तुम्हाला वापस घेऊन जाते, तुम्ही त्यासाठी तयार होऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT