Actor Vidyut Jamwal  Team esakal
मनोरंजन

जगातील टॉपच्या मार्शल आर्टिस्टच्या यादीत, विद्युत जामवाल

विद्युतनं गेल्या काही वर्षांपासून आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता विद्युत जामवाल (vidyut jamwal) हा त्याच्या स्टंटसाठी प्रसिध्द आहे. आपल्या चित्रपटांमध्ये तो स्टंटमॅन (stuntman) न घेता स्वत;च सगळे स्ट्ंट करत असल्याचे दिसून आले आहे. तो त्याच्या वेगळ्यापणासाठी प्रख्यात आहे. बॉलीवूडमध्ये थोडेच असे आहेत की जे स्वताच्या मुव्हीमध्ये स्टंट करतात. आणि त्यासाठी ते ओळखलेही जातात. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास अक्षय कुमार (akshay kumar), टायगर श्रॉफ (tiger shroff) यांची नावे घ्यावी लागतील. विद्युतनं गेल्या काही वर्षांपासून आपली वेगळी ओळख तयार केली आहे. त्याच्या स्टंटममुळे तो प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. ती त्याची कमाल आहे. (vidyut jamwal the list of world top martial assistants now fans are praising know the whole thing)

सोशल मीडियावरही (social media) विद्युत (vidyut jamwal)प्रचंड लोकप्रिय असणारा अभिनेता आहे. ती त्याची वेगळी ओळख आहे. त्याचा फॅनफॉलोअर्सही आहे. आपल्या स्टंटबाजीमुळे चित्रपट हिट करण्याची ताकदही विद्युतजवळ आहे. आता त्याच्या नावाचा समावेश जगातील सर्वाधिक प्रभावशाली आणि सर्वोत्तम मार्शल आर्टिस्टमध्ये (martial arts) झाला आहे. त्यानं याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. त्यानं आपल्या फोटोला कॅप्शन देताना असे लिहिले आहे की, जेव्हा तुम्ही माझे नाव गुगलवर शेअर कराल तेव्हा ते नावाच्या बाजुला जगातील सर्वोत्तम मार्शल आर्टिस्ट असे लिहिलेले आढळेल असेही त्याने सांगितले.

विद्युतनं त्याच्या इंस्टाचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. त्यानं लिहिलं आहे की, जय हिंद कलारीपयट्टू. विद्युतचे नाव आता जॅकी चॅन, ब्रुस ली, जॉनी ट्राय गुयेन, स्टीवन सीगल, डोनी येन, टोनी जा यांच्या सोबत घेतले गेले आहे. ज्यावेळी इंटरनेटवर ही घोषणा झाली त्याचबरोबर त्याच्या फॅन्सनं कौतूकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, तुला कोणीही हरवू शकत नाही.

विद्युत जामवाल हा एकमेव भारतीय कलाकार आहे ज्याचा समावेश अशाप्रकारच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याच्यावर देशभरातून कौतूक केले जात आहे. सोशल मीडियावर विद्युत जामवाल त्याचे स्टंटचे व्हिडिओ शेअर करत असतो. ज्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळालेली दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT