Vijay Deverakonda:  esakal
मनोरंजन

Vijay Deverakonda: Kushi हिट होताच विजयनं उचललं मोठा निर्णय! आता 100 कुटुंबांना देणार...

Vaishali Patil

Vijay Deverakonda: सध्या चित्रपटगृहात साउथची सुपरहिट जोडी विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांचा 'कुशी' हा चित्रपट रिलिज झाला आहे. हा चित्रपट 'कुशी' 1 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा एक या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात आहे. बऱ्याच दिवसांनंतर विजयच्या चित्रपटला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. 'कुशी' चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही समिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

'कुशी'चे दिग्दर्शिन शिव निर्वाण यांनी केले आहे. हा तेलुगूसोबतच, तमिळ आणि हिंदीतही प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर खुप चांगली कमाई केली आहे.

चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर विजय देवरकोंडाने त्याच्या चाहत्यांना एक मोठ वचन दिलं आहे. त्याने एका कार्यक्रमात जाहिर घोषणा केली आहे.

विजय देवरकोंडा नुकताच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ ट्रेड अॅनालिस्ट आणि चित्रपट समीक्षक मनोबाला विजयबालन यांनी ट्विटरवर शेयर केला आहे.

'कुशी' चित्रपटातून कमावलेली रक्कम तो 100 कुटुंबांना देणार असल्याचं त्यांने या व्हिडिओत सांगितले आहे. विजय देवरकोंडा नुकताच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ ट्रेड अॅनालिस्ट आणि चित्रपट समीक्षक मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. तेलुगू भाषेत त्याने ही घोषणा केली आहे.

या व्हिडिओत तो म्हणाला की, आनंद व्यक्त करतानी मला जाहीर करायचं आहे की मी माझ्या कमाईतून 1 कोटी रुपये 100 वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये वाटणार आहे. यात प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये मिळणार आहेत. हे सर्व पैसे मी माझ्या वैयक्तिक खात्यातून देणार आहे.

कुशीच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास पहिल्या दिवशी या चित्रपटाने तेलुगूमध्ये 15 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली होती. आता या चित्रपटाने 60 कोटींचा आकडा पार केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray यांच्या बैठकींचा धडाका! पुण्यातील 'या' ८ मतदारसंघात शिलेदार ठरले

नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाआधीच्या विधींना उत्साहात सुरुवात; फोटो पाहून नेटकरीही करतायत कौतुक

Latest Maharashtra News Updates : परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर

Sharad Pawar: आचारसंहिता जाहीर झाली तरी मविआत गोंधळाचं वातावरण! शरद पवार निभावणार मध्यस्थीची भूमिका

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजप विरोधात बंडखोरी? शिवसेना शिंदे गट उमेदवार देण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT