Vijay Deverakonda put his feet during press meet now actor reacted to the controversy Google
मनोरंजन

'विजय देवरकोंडानं भर कार्यक्रमात टेबलवर चक्क...', व्हिडीओ पाहून भडकले लोक

विजय देवरकोंडा 'लाइगर' सिनेमाच्या प्रमोशननिमित्तानं हैदराबाद मध्ये गेला असताना तिथल्या पत्रकार परिषदेतील व्हिडीओनं अभिनेत्याला वादात ओढलं आहे.

प्रणाली मोरे

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडा सध्या आपल्या आगामी 'लाइगर' सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. या बिग बजेट सिनेमात विजय देवरकोंडा सोबत अनन्या पांडेदेखील(Ananya Panday) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दोघे कलाकार सध्या भारताच्या वेगवेगळ्या शहरात सिनेमाच्या प्रमोशनसाठी जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच विजय देवरकोंडा हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेत हजर राहिला होता. तिथे उपस्थित पत्रकारांसोबत बातचीत करता-करता विजयने आपले दोन्ही पाय समोरील टेबलवर ठेवले ज्यावरनं आता त्याला चांगलेच सुनावले जात आहे. काही प्रसारमाध्यमांनी आपल्या बातम्यांमधून विजयच्या अशा वागण्यावर प्रश्न उठवत आक्षेप घेतला आहे. अर्थात पत्रकार परिषदेचा पूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर विजयने टेबलवर पाय का ठेवले हे स्पष्ट होताना दिसत आहे.(Vijay Deverakonda put his feet during press meet now actor reacted to the controversy)

पत्रकार परिषदेत विजयला एका पत्रकारानं प्रश्न केला की, 'टॅक्सीवाला' सिनेमाच्या रिलीजच्यावेळी तो सर्व पत्रकारांशी मोकळेपणाने बोलत होता पण आता तसं दिसत नाही. ज्यावर विजयने पत्रकारांना तसं काही नाही असा विश्वास निर्माण करुन देण्याचा प्रयत्न केला आणि आरामात मी गप्पा मारत आहे हे दाखवून देण्यासाठी त्याने आपले पाय टेबलवर ठेवले.

Vijay Deverakonda put his feet during press meet now actor reacted to the controversy

विजयने असं करुन दाखवल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विजयने मजामस्तीत असं केलं पण ही गोष्ट सर्वांनाच पटली नाही. कारण त्यानंतर एका वाहिनीनं तो व्हिडीओ शेअर केला आणि त्यावर नाराजगी दर्शवली. विजयने आता एक ट्वीट करत यावर लिहिलं आहे की, ''कोणतीही व्यक्ती जी आपल्या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करते तिच्यावर नेहमीच निशाणा साधला जातो, तिला मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातो. पण मी कायम याविरोधात लढत राहणार. आणि जेव्हा तुम्ही ईमानदारीनं काम करता तेव्हा तुम्ही नेहमीच स्वतःसाठी आणि समोरच्यांसाठी उत्तम गोष्टींचीच मागणी करता. तुमच्या चाहत्यांचे आणि देवाचे तुमच्यावर असलेले प्रेम तुमची कायम रक्षा करतं यावर माझा विश्वास आहे''. विजय देवरकोंडाच्या 'लाइगर' विषयी बोलायचं झालं तर २५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. यामध्ये राम्या कृष्णन,रोनित रॉय, मकरंद देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन्नाथ पुरीनं केलं आहे.

विजय देवरकोंडाच्या 'लाइगर' विषयी बोलायचं झालं तर २५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. यामध्ये राम्या कृष्णन,रोनित रॉय, मकरंद देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन्नाथ पुरीनं केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT