Vijay Raghavendra's Kannada Actor Wife Spandana Dies due to Heart Attack  SAKAL
मनोरंजन

Vijay Raghvendra Wife: प्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्रच्या पत्नीचं दुर्दैवी निधन

Devendra Jadhav

Vijay Raghvendra Wife Death News: कन्नड अभिनेते विजय राघवेंद्र यांच्या पत्नी स्पंदना राघवेंद्र यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोघेही थायलंडमध्ये असताना ही घटना घडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय राघवेंद्र यांच्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. विजय यांची बायको स्पंदनाच्या निधनामुळे चाहत्यांनी दुःख व्यक्त केलंय.

(Vijay Raghavendra's Kannada Actor Wife Spandana Dies due to Heart Attack)

विजय राघवेंद्र आणि स्पंदना यांचा विवाह २६ ऑगस्ट २००७ रोजी झाला. स्पंदना ही निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त बी.के. शिवराम यांची मुलगी होती. त्यांना शौर्य नावाचा मुलगा आणि एक मुलगी होती.

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या "अपूर्वा" या चित्रपटात स्पंदनाने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. दुःखद गोष्ट म्हणजे ही दुर्दैवी घटना त्यांच्या लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा करण्याआधी घडली. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला १९ दिवस बाकी असताना ही घटना घडली.

विजय राघवेंद्र सध्या बेंगळुरूमध्ये आहे. जिथे तो २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘कड्डा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होणार होता. मात्र, पत्नी स्पंदनाचे अचानक निधन झाल्याने त्याने प्रमोशन पुढे ढकललं आहे.

स्पंदनाचे वडील बीके शिवराम मुलीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी बँकॉकला रवाना झाले आहेत. तिचे पार्थिव मंगळवारी परत आणले जाण्याची शक्यता आहे.

विजयचा चुलत भाऊ, पुनीत राजकुमार, एक ख्यातनाम कन्नड अभिनेता होता ज्यांचे ऑक्टोबर 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता बायकोच्या निधनाने विजय आणि त्याच्या कुटुंबाला नुकसान झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT